सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ समोर येत असतात. काही व्हिडीओ हसवणारे असतात तर काही व्हिडीओ संतापजनक असतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हिडीओ व्हायरल होत आहे. महिलांना खरोखरच आज मानसन्मान दिला जातोय का? मानसन्मान, प्रतिष्ठा हे शब्द केवळ भाषणापुरते मर्यादित आहेत का? की पुस्तकात वाचण्यापुरते मर्यादित आहेत? वास्तव नेमकं काय आहे? स्त्रियांना आजही भोग वस्तू समजलं जातंय का? स्त्रियांची आजही अवहेलना होतेय का? खरतर महिलांचा सन्मान करणे आदर देणे हे लहानपणापासून मुलांना घरात सांगितले जाते, तरीही काही अल्पवयीन मुलं मुलींची छेड काढतानाची प्रकरणं समोर आली आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

छत्तीसगड चे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेता डॉ.रमण सिंह यांनी एक संतापजनक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये गर्ल्स हॉस्टेलवर एक मुलगा मुलीला लाथा बुक्क्यांनी मारत असल्याचं दिसत आहे. भूपेश बघेल सरकारवर टीका करत डॉ. रमन सिंह यांनी हा व्हिडिओ ट्वीट केला आहे. निर्लज्ज सरकार सर्व काही पाहूनही गप्प आहे. अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे.

ती कळवळली तरीही…

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक अल्पवयीन तरुण एका तरुणीला मारहाण करत आहे. ही तरुणी या तरुणाला थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. यावेळी ती दरवाजा अडवून उभी राहते तेव्हा हा तरुण तिच्या पोटात जोरात लाथ मारतो. हा तरुण अतिशय निर्दयपणे त्या मुलीच्या पोटात लाथ मारताना दिसला. यानंतर ही तरुणी कळवळून खाली पडली. तिला प्रचंड जोरात लाथ लागली असेल याचा अंदाज व्हिडीओ पाहून येतो. ती कळवळली तरीही त्याला दया आली नाही, ती तशीच खाली झोपून राहीली.

पहा व्हिडिओ

हेही वाचा काय करायचं ते कर! सीटसाठी मेट्रोमध्ये महिलांची हाणामारी; VIDEO पाहून म्हणाल, “या बायका म्हणजे…”

हा सर्व प्रकार एक वसतीगृहातील असल्याचं बोललं जातं आहे. दरम्यान या मुलीला झालेली मारहाण ही अतिशय गंभीर असून व्हिडीओ पाहून नेटकरीही संतापले आहेत. तर वसतीगृहाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर आणि त्या अल्पवयीन मुलावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhattisgarh girl beaten up by boy in hostel room video viral on social media bjp leader raman singh shared video on twitter srk
Show comments