डॉक्टरांच्या पेशाला काळीमा फासणारी एक घटना उघडकीस आली आहे. रक्तदाब कमी झाला म्हणून मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी आलेल्या एका महिलेलाच एका डॉक्टरने मारहाणी केल्याचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला देखील त्या डॉक्टरची चीड येईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खरंतर डॉक्टरांना देवाचा अवतार मानलं जात. प्रत्येक रुग्णाची सेवा करणं हा डॉक्टरांचा धर्म असतो. मात्र, देव समजले जाणाऱ्या डॉक्टरांच्या पेशाला काळीमा फासण्याचे काम छत्तीसगडमधील येथील एका डॉक्टरने केलं आहे. कारण, सध्या कोरबा जिल्ह्यातील एका रुग्णालयातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमध्ये डॉक्टरने एका महिलेला कानाखाली मारल्याचं दिसतं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोरबा जिल्ह्यातील एका गावातील महिला रक्तदाब कमी झाला म्हणून आपल्या नातेवाईकांसोबत रुग्णालयात उपचारासाठी आली होती. यावेळी तिथे उपस्थित असणाऱ्या एका कथित डॉक्टरने त्या महिलेला स्ट्रेचरवर झोपवलं आणि तिला नातेवाईकांसमोरच मारहाण करायला सुरुवात केली. डॉक्टरचं हे कृत्य पाहून सर्वांनाच धक्का बसला. एवढंच नव्हे तर स्वता:च नशेत असलेला हा डॉक्टर त्या महिलेलाच म्हणतोय, ” एवढी दारु का पिली, तुला मारणार” असं म्हणत त्याने महिलेला कानाखाली मारत तिचे केस देखील खेचल्याचं या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.

आणखी वाचा- Video: तरुणीच्या नाकाला हाडच नाही, नुसतं बोट लावलं तरी पार…; लवचिकता पाहून नेटकरी झाले अवाक

हा व्हिडीओ व्हायरल होताच नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत डॉक्टरची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या घटनेनंतर कोरबा मेडिकल कॉलेजकडून संबंधित डॉक्टरला कारणे द्या नोटीस पाठवल्याचं सांगण्यात आलं आहे. शिवाय डॉक्टवरत नियमानुसार कारवाई करणार असल्याचंही म्हटलं आहे. तर चौकशीदरम्यान हा डॉक्टर नशेत असल्याचं उघड झालंय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhattisgarh news korba doctor beat up the woman who came to hospital for treatment video viral jap