शोले चित्रपटातील डायलॉग सर्वांना माहित आहे, मात्र याठिकाणी प्रियकर नाही तर प्रेयसी टॉवरवर चढल्याचं प्रकरण समोर आलं आहे, छत्तीसगडमधील एका गावात प्रियकर-प्रेयसीचा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. प्रियकरावर चिडलेली प्रेयसी सुमारे १५० फूट उंच खांबावर चढली. कहर म्हणजे तिचे मन वळविण्यासाठी प्रियकरही खांबावर चढला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनिता भैना ही नवापूर गावातील महिला दोन दिवसांपासून कोडगर गावात मुकेश भैना याच्या घरी राहात होती. गुरुवारी दोघांमध्ये किरकोळ वाद झाला आणि चिडून अनिता घराबाहेरील विजेच्या टॉवरवर चढली. मुकेश तिच्या मागे धावला, थांबविण्याचा प्रयत्नही केला; पण काही उपयोग झाला नाही. अखेर तोही टॉवरवर चढला. टॉवरवरच दोघांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली. त्यानंतर दोघे एकत्र खाली उतरले. तोपर्यंत पोलिस आले, दोघांना पोलिस ठाण्यात नेले आणि चौकशीनंतर अनिताला तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. अनिता विवाहित असून, पतीपासून वेगळी राहते आणि मुकेशच्या प्रेमात असल्याचे सांगितले जाते. गर्दीतील कोणीतरी व्हिडीओ बनविला तो आता व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – मुलीने केलं आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण, केबिन क्रू बनून विमानात केलं जंगी स्वागत; हृदयस्पर्शी VIDEO पाहून नेटकरी झाले भावूक

सुमारे अर्धा तास प्रेमीयुगुल टॉवरवर बोलत होते, त्यानंतर दोघे एकत्र खाली गेले. खाली उतरताच तरुण फरार झाला, तर तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांनी तिच्याकडे सखोल चौकशी केली. व्हिडीओला लाखो लोकांनी पाहिलं असून नेटकरी संमीश्र प्रतिक्रिया यावर देत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhattisgarh news woman climbed 150 feet high tower after a fight with lover twist came when boyfriend climbed to persuade video viral on social media srk