Chicken Biryani Contest Video : जगभरात आणि विशेषत: भारतात बिर्याणी आवडीने खाणाऱ्यांची कमी नाही. बरेच लोक आहेत, ज्यांना तुम्ही तुमचा आवडीचा पदार्थ कोणता असं विचारल्यावर ते बिर्याणी असे उत्तर देतात. भारतात विविध प्रकारे बिर्याणी बनवली जाते. व्हेज, नॉनव्हेज अशा दोन्ही प्रकारच्या बिर्याणीत तुम्हाला व्हरायटी पाहायला मिळते. पण, एक व्यक्ती किती बिर्याणी खाऊ शकतो हे ज्याच्या त्याच्या भूक आणि आवडीवर अवलंबून असते. पण, तुम्हाला कोणी सांगितले की प्लेटभर बिर्याणी खा आणि एक लाख रुपये जिंका, तर… तुम्हाला विश्वास नाही बसत का? तर खालील व्हिडीओ पाहाच.

अलीकडेच अशाच बिर्याणीच्या शौकीन असलेल्या लोकांसाठी तामिळनाडूतील कोईम्बतूरमध्ये एक अनोखी स्पर्धा सुरू झाली आहे. येथील बोचा एक्स्प्रेस ट्रेन हॉटेलमध्ये बिर्याणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये बिर्याणी खाण्यासाठी लाखोचे बक्षीस दिले जात होते.

Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
prank with sandwich seller | Funny Viral Video
“हे सँडविच कोणी बनवले?” तरुणाने जोराने ओरडत विचारले, विक्रेता घाबरत पुढे आला अन्… पाहा व्हायरल VIDEO
Dirty Ice Cream Making Video never buy and eat 5 rupees ice cream in shop
पाच रुपयांत मिळणारे कप आईस्क्रीम खाणाऱ्यांनो ‘हा’ Video पाहाच; पुन्हा खाताना १०० वेळा कराल विचार
Man wrote message for his wife in back of the car video goes viral
किती ते प्रेम! नवऱ्यानं बायकोसाठी कारच्या मागे लिहला खास मेसेज; रस्त्यावर सर्व बघतच राहिले, VIDEO पाहून कराल कौतुक
A man sitting on a road in front of the police station was hit by a truck
VIRAL VIDEO: पोलीस चौकीसमोर ठाण मांडून बसला अन् मागून वेगवान ट्रकने दिली धडक, पुढे जे काही घडलं ते पाहून बसेल धक्का
Vasai, bhayandar railway station suicide, father and son suicide, Jai Mehta, dual marriage, Bhayandar railway station, southern girl
वसई : पिता पुत्राचे रेल्वे रूळावरील आत्महत्येचे गूढ उकलले; मुलाचे प्रेमसंबंध उघड
Animal fight video deer vs crocodile video
VIDEO: “नशीब नाही मित्रा प्रयत्नांचा खेळ आहे”, हरणानं मृत्यूच्या दारातून मारलेली उडी पाहून तुम्हीही व्हाल अवाक्

३० मिनिटांत सहा प्लेट बिर्याणी खाणाऱ्यास १ लाखांचे बक्षीस

हॉटेलच्या व्यवस्थापनाने जाहीर केले आहे की, जर कोणत्याही ग्राहकाकडे ३० मिनिटांत सहा प्लेट बिर्याणी खाण्याची क्षमता असेल, तर त्याला एक लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार सहा प्लेट स्पर्धेव्यतिरिक्त चार प्लेट बिर्याणी खाण्यासाठी २५ हजार रुपये बक्षीस ठेवले होते.

बिर्याणी खाण्यासाठी लोकांची हॉटेलबाहेर गर्दी

या घोषणेनंतर हॉटेलमध्ये बिर्याणी खाणाऱ्यांची गर्दी पाहायला मिळली. न्यूज एजन्सी एएनआयने रेस्टॉरंटचा एक व्हिडीओही जारी केला आहे, ज्यामध्ये अनेक लोक रांगेत बसून बिर्याणी खाताना दिसत आहेत. मात्र, कोईम्बतूर पोलिसांनी रेस्टॉरंटविरोधात गुन्हा दाखल केल्याचीही बातमी समोर आली आहे. विनापरवाना बिर्याणी स्पर्धा आयोजित केल्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी आणि सार्वजनिक जनजीवन विस्कळीत झाल्याचा आरोप आहे.

Read More News : घरातून येऊ लागला भयानक आवाज; कोपऱ्यातील बॅग उचलताच दिसले असे काही की…; Video पाहून तुम्हालाही फुटेल घाम

पण, अशा प्रकारची स्पर्धा पहिल्यांदाच आयोजित केली जात नाही. काही काळापूर्वी पुण्यातील एका हॉटेलमध्ये भरघोस बुलेट थाळी खाण्यासाठी बक्षीस म्हणून बुलेट बाईक दिली जात होती.