scary crocodile attack video: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. आपल्यासमोर दररोज हजारो व्हिडीओ येत असतात. ज्यांपैकी काही व्हिडीओ हे खरंच आपल्या मनात घर करुन बसतात. पण काही व्हिडीओ असे देखील असतात. जे आपल्या हृदयाचा ठोका चुकवतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून तुम्हाला त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी हेच कळणार नाही. मगर किती धोकादायक प्राणी आहे, हे सर्वजण जाणतात. मगरीचे तोंड इतके विशाल प्रमाणात उघडते की, त्यामध्ये कोणताही सजीव सहज मावेल. मगर अशी हल्ला करते की, कोणताही जीव तिच्या थेट तोंडात जाईल. मात्र एक कोंबडी स्वत:च मगरीच्या तोंडात गेली आणि पुढे काय झालं हे तुम्हीच पाहा..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आ बैल मुझे मार ही म्हण तुम्ही एकलीच असले, अगदी याच म्हणीचा प्रत्यय हा व्हिडीओ बघून येतो. कारण मगर किती खतरनाक आहे, याचा अंदाज माणसांपासून प्राण्यांपर्यंत सगळ्यांनाच आहे. तरीही ही कोंबडी अगदी सहज मगरीच्या तोंडात गेली आणि स्वत:च्या जीवाला मुकली. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मगर आपली शिकार शोधण्याचा प्रयत्न करत असतानाच एक कोंबडू तिच्या बाजूला येते आणि सहज मगरीच्या तोंडात पाय आणि ठेवते, हीच संधी साधत मग मगरही कोंबडीला जबड्यात पकडते आणि खायचा प्रयत्न करते, यावेळी कोंबडी स्वत:चा जीव वाचवण्याचा खूप प्रयत्न करते मात्र मगर तिला खाऊन टाकते.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान तरुणाची महिला पोलिसांना मारहाण; स्टेडियममधला VIDEO होतोय व्हायरल

आधीच जर कोंबडी सावध राहून मगरीपासून लांब राहीली असती तर आज ही वेळ आली नसती. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

@MoreCrazyClips अकाउंट वर नुकताच एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. यावर अनेक कमेंट केल्या जात आहेत. युजर म्हणत आहेत की, इतकेही धाडस चांगले नाही की, जीवही जाऊ शकतो.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chicken her self enter in crocodile mouth scary attack video viral on social media wild life srk