सोशल मीडियावर नेहमी अनेक प्रकारचे अघाताचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ बघून अंगावर काटा येतो तर काही चमत्कारासारखे वाटतात. त्यातही लहान मुलांवर खेळताना फार लक्ष ठेवणं आवश्यक आहे. बऱ्याचदा खेळतानाच मुलं जखमी होण्याची शक्यता जास्त असते. अशाच एका घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अनेकदा आपण चित्रपटांमध्ये अशी दृश्य पाहतो. मात्र ही दृश्य चित्रपटातील नाही तर, रिअल लाईफमधील आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत खूप जणांनी पाहिलंय आणि शेअरसुद्धा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो, एक चिमुरडी रस्त्यावरून जातेय आणि अचानक समोरून एक गाडी येते बाईक येते आणि चिमुकलीला उडवून जाते. तशी ती रस्त्यावर पडते. इतक्यात मागून दुसरी बाईक येते ती तिच्या अंगावरून जाते. पुन्हा तिसरी बाईक येते तीसुद्धा तिला चिरडून जाते. चिमुकली गाडीखाली येते गाडी बघता बघता अक्षरशः तिच्या अंगावरून जाते. हे पाहतानाही अंगावर काटा येतो आणि सगळं संपलं असं वाटतं तेवढ्यातच चमत्कार म्हणावा कि काय असच काहीस घडत आणि यातून हि मुलगी सहीसलामत बचावते आणि उठून उभी राहते. तेवढ्यात तिची आई येते आणि तिला बाजूला घेऊन जाते.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – विहिरीत अडकलेल्या बिबट्याचं खतरनाक रेस्क्यू! आग लावली, शिडी टाकली, Video पाहून नेटकरी संतापले

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हा.रल होत असून या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज गेले आहेत. नेटकरीही हा अपघात बघून अवाक झाले आहेत. तर पालकांनी मुलांकडे व्यवस्थित लक्ष देण्याचं आवाहन नेटकरी करत आहेत.