आई होणं ही प्रत्येक स्त्रीसाठी भावनिक गोष्ट असते. ज्या क्षणाला तुम्हाला तुम्ही ‘आई’ होणार आहात हे समजतं तो क्षण तुमच्यासाठी काळजाचा ठोका चुकवणारा असतो. कोणत्याही स्त्रीसाठी प्रेगन्सीचा काळ हा खासच असतो. एक नवा जीव आपल्यातून निर्माण होणार आहे ही भावनाच वेगळी असते. त्यात पहिल्यांदाच हा अनुभव घेणाऱ्या महिलांसाठी काय करावे आणि काय करू नये असं होऊ शकतं. मात्र कधी कधी हा आनंद फार काळ टिकत नाही कारण कधी बाळ बाळ सुदृढ जन्माला येत नाही. मात्र आता समोर आलेलं प्रकरण जरा वेगळं आहे. कारण एका महिलेनं चक्क एलियन’ सारख्या मुलाला जन्म दिला आहे. मुलाला पाहून डॉक्टरांसोबतच आईलाही मोठा धक्का बसला आहे. बाळाला पाहून एकच खळबळ माजली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक चिमुकला अगदी एलियन सारखा दिसतो. हा मुलाला पाहून आईच्या हृदयाला मोठा धक्काच बसला. चेहऱ्यारपासून संपूर्ण शरीर पांढरं असलेला हा चिमुकला हूबेहूब एका एलियन सारखा दिसतोय. असं वाटतं की त्याला सिमेंटचा लावलं आहे. या चिमुकल्याचा शरीरावर अनेक भेगाही दिसत आहेत. या मुलाला दुर्मिळ असा हार्लेक्विन इचथायोसिस नावाचा अनुवांशिक आजार झाला आहे. या आजारामध्ये त्वचेवर वाईट परिणाम दिसून येतात.
हार्लेक्विन इचथायोसिस म्हणजे काय
हा एक अनुवांशिक विकार आहे ज्यामुळे जन्माच्या वेळी जवळजवळ संपूर्ण शरीरावर त्वचा जाड होते. त्वचेवर मोठ्या आकाराच्या प्लेट्स बनतात ज्या खोल क्रॅकने विभक्त होतात. हे पापण्या, नाक, तोंड आणि कान यांच्या आकारावर परिणाम करतात आणि हात आणि पाय यांच्या हालचाली मर्यादित करतात. छातीच्या मर्यादित हालचालीमुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. या प्लेट्स कित्येक आठवडे पडतात.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – याला म्हणतात प्रेम! भावाला हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदाच भेटून बहिणीला आलं रडू, गोड नात्याचा VIDEO व्हायरल
अशी प्रकरणे अत्यंत दुर्मिळ आहेत. पण नऊ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर असे मूल पाहिल्यावर आईच्या दु:खाची आपण कल्पनाही करु शकत नाही. अशा जन्मजात दोषांनी जन्मलेल्या मुलांना अनेक ठिकाणी देव मानून त्यांची पूजा केली जाते, तर अनेक ठिकाणी त्यांना भूत समजले जाते. सोशल मीडियावर शेअर केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो वेळा पाहिला गेला आहे. लोकांनी मुलासाठी प्रार्थना केली. तसेच आईला हिम्मत ठेवण्याचा सल्ला दिला.