Viral Video : सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक व्हिडीओ मजेशीर व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एका चिमुकल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका चिमुकल्याबरोबर संवाद साधला आहे. या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की चिमुकल्याने या प्रश्नांनी खूप मजेशीर उत्तरे दिली आहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल.

या व्हायरल व्हिडीओत तुम्हाला दिसेल की जेव्हा चिमुकल्याला विचारते की त्याच्या शाळेचे नाव काय? तेव्हा चिमुकला सांगतो, “भागवत प्रसाद मेमोरियल इंटर कॉलेज बांदा, बिहार” त्यानंतर या चिमुकल्याला विचारते की त्याचे नाव काय? त्यावर चिमुकला सांगतो, “माय नेम इज विवेक कुमार” सर्वात शेवटी त्याला एक डायलॉग म्हणायला सांगतात तेव्हा चिमुकला तिरंगा चित्रपटातील डायलॉग म्हणताना दिसतो. चिमुकला म्हणतो, “‘ना गोली ना तलवार से, बंदा डरता है तो बापू की मार से’त्याचा हा डायलॉग ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल.

udit narayan lip kiss with fan in live show video viral
Video: ‘टिप टिप बरसा पानी’ गाताना उदित नारायण यांनी महिला चाहत्यांना केलं किस, Lip Kiss चा व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
vidya balan distributes food and clothes to needy people video viral
Video: गरजूंना वाटले कपडे अन् वडापाव; बॉलीवूड अभिनेत्रीचा व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “माणुसकी अजून जिवंत आहे”
dada kondke
Video : “हाडाचा कलाकार आहे भाऊ! रडला पण डान्स नाही विसरला”; दादा कोंडके स्टाईल चिमुकल्याचा डान्स पाहून पोट धरून हसाल
Video of a little child presents amazing lavani dance in a school program
Video : काय भारी नाचतोय राव! जि.प. शाळेत चिमुकल्याने सादर केली अप्रतिम लावणी; नेटकरी म्हणाले, “याच्यासमोर सर्व लावणी सम्राज्ञी फिक्या..”
marathi actor shares his opinion on chhaava movie
“लहान तोंडी मोठा घास, पण…”, ‘छावा’चा ट्रेलर पाहून मराठी अभिनेत्याने व्यक्त केली ‘ती’ खंत; विकी कौशलबद्दल म्हणाला…
Young child in Pune sells dustbin bags
Video : पुण्यात एफसी रोडवर डस्टबिन बॅग विकणाऱ्या आरबाजला आहे इतिहासाची आवड; म्हणाला, “छत्रपती शिवाजी महाराज…’
Maharashtrachi Hasyajatra Fame Shivali Parab shramesh betkar reels video viral
Video: “चेहरा क्या देखते हो…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परब-श्रमेश बेटकरचा ‘हा’ Reel व्हिडीओ पाहिलात का? एक्सप्रेशन्सने वेधलं लक्ष

हेही वाचा : “नवरा असावा तर असा!” बायको शेजारी बसून पोळ्या लाटताना दिसतोय तरुण, व्हिडीओ होतोय व्हायरल

तुम्ही तिरंगा हा चित्रपट पाहिला असेल. या चित्रपटातील अनेक डायलॉग लोकप्रिय आहेत. या चित्रपटातील दिग्गज अभिनेता राज कुमार यांचा खूप जास्त लोकप्रिय झालेला ‘ना गोली ना तलवार से, बंदा डरता है तो बापू की मार से’ हा डायलॉग या चिमुकल्याने त्याच्या अंदाजात म्हणून दाखवला आहे.सध्या घरबसल्या तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून मनोरंजन करू शकता. सोशल मीडियावरील या चिमुकल्याचा व्हिडीओ पाहून तुमचे सुद्धा चांगलेच मनोरंजन होईल.

ghantaa या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “हा मुलगा आयुष्यात काहीतरी बनेल” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “बच्चे मन के सच्चे” तर एका युजरने लिहिलेय, “बापू सेहत के लिए हानिकारक है” आणखी एका युजरने लिहिलेय, “चिमुकला मनातील गोष्ट बोलला”

Story img Loader