Viral video: मुलं देवाघरची फुलं असं आपण नेहमी म्हणतो कारण ते नेहमी खरं बोलतात. सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात लहान मुलांचे व्हिडीओ लोकांना फार आवडतात, त्यांचा निरागसपणा सगळ्यांनाच भावतो. अशाच एका चिमुकल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल. सगळीच लहान मुलं अभ्यास न करण्यासाठी नेहमीच टाळा टाळ करत असतात. मात्र या चिमुकल्याला अभ्यास नाही तर काय आवडतं हे तुम्हीच पाहा.
सोशल मीडियावर कायमच लहान मुलांचे फनी व्हिडीओ व्हायरल होत असतात. या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांच्यातील निरागसता आपण कायमच अनुभवत असतो सध्या अशाच एका चिमुकल्याची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे. रोजरोज अभ्यास करुन कंटाळलेल्या या चिमुकल्याने आईकडे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हा चिमुकला आपल्या आईशी भोजपुरीमध्ये बोलत आहे. हा चिमुकला अभ्यास न करण्यासाठी आईला कारणं सांगत आहे. मुलाचे म्हणणे आहे की त्याला अभ्यास अजिबात करावासा वाटत नाही आणि नुसते खावेसे वाटते. चिमुकला रडत रडत आपल्या भावना आईला सांगतोय. सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोक या व्हिडिओला भरभरून प्रेम देत आहेत. हा व्हिडिओ छपरा डिस्ट्रिक्ट नावाच्या युजरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत २ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. व्हिडीओ शेअर करताना युजरने कॅप्शन लिहिलं आहे की, अभ्यास करायचा मूड नाही फक्त खायचा मूड आहे”
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> Uttarkashi video: शेवटी बापाचं काळीज! माझं रोपटं वाचलं; १७ दिवसांनंतर लेक बाहेर येताच वडिलांना अश्रू अनावर
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर लोक आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने या पोस्टवर लिहिले की, ‘मुलाने सत्य सांगितले आहे.’ दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘तो खूप गोंडस मुलगा आहे.’ त्याचवेळी एका यूजरने लिहिले की, ‘१०० टक्के प्रामाणिकपणा.’