Crocodile Viral Video : इंटरनेटचं जग खूपच वेगळं आहे. या जगात कधी काय पाहायला मिळेल, याचा अंदाज लावता येत नाही. दिवसेंदिवस सोशल मीडियावर थरारक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. काही व्हिडीओ लोकांचे मनोरंजन करतात, तर काही थरकाप उडवतात. अशाच प्रकारचा एक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. खतरनाक प्राण्यांमध्ये मगरीचाही समावेश असतो. तहानेनं व्याकुळ झालेले प्राणी नदीकाठावर आल्यावर मगरीचे शिकार होतात. एव्हढच नाही तर मगरीच्या हल्ल्यात माणसांचीही शिकार झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. पण यावेळी काहीसं वेगळं घडलं आहे. नदीत बुडालेल्या मुलाला एका मगरीने पाठीवर घेऊन मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिल्याचं एका व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे. ही घटना इंडोनेशिया येथील असून मगरीचा व्हिडीओ पाहून सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नदीत बुडालेल्या मुलाला मगरीने पाठीवर घेत नदीकाठावर आणल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. मगरीतही माणुसकी दडली आहे, अशाप्रकारच्या प्रतिक्रिया नेटकरी देताना दिसत आहेत. इंडोनेशियात चार वर्षांचा मुलगा दोन दिवसांपासून बेपत्ता होता. पोलिसांचे पथक, कोस्टगार्ड या मुलाला शोधण्यासाठी प्रयत्न करत होते. याचदरम्यान एक मगर नदीच्या पाण्यावर तरंगताना दिसली. हे दृष्य पाहून सर्वांना धक्का बसला.डेली मेलच्या रिपोर्टनुसार, मुलाच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या जखम नव्हती. म्हणजेच मगरीने त्याच्यावर हल्ला केला नव्हता. नदीत बुडालेल्या मुलाला मगरीने पाठीवर घेऊन नदीकाठावर आणले. हे पाहून ईस्ट कालीमंतन सर्च अॅंड रेस्क्यू एजेंसीच्या सदस्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. आयएफएस सुसंता नंदा यांनी हा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर केला आहे.

इथे पाहा व्हिडीओ

व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये म्हटलंय, एक विशाल मगरीने नदीत बुडालेल्या मुलाला पाठीवर घेऊन मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. मगरींनी भरलेल्या नदीत मुलाचा मृतदेह शोधण्यात कुटुंबीयांना अपयश आलं होतं. पण एका मगरीने पाठीवर मृतदेह घेऊन किनारा गाठल्याने कुंटुंबीयांना मृतदेह मिळाला. या व्हिडीओला आतापर्यंत १३१.६ k व्यूज मिळाले आहेत. तर दोन हजारांहून अधिक जणांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, “हा देवाचा चमत्कार आहे की देव स्वत: या रुपात आला आहे.”