Viral Video: देशातील अनेक भाग अजूनही उन्हामुळे त्रस्त आहेत. आईस्क्रीम किंवा कोणताही कूलर जेवढा आपल्याला कडक उन्हापासून दिलासा देत नाही तेवढा पाऊस देतो. सगळेच सध्या पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ईशान्येकडील राज्यांमध्ये मान्सूनचे आगमन होण्यास काही दिवस लागतील, पण तोपर्यंत हा व्हिडीओ नक्कीच मन:शांती देऊ शकेल. एका लहान मुलाचा पावसाचा आनंद लुटतानाचा हा व्हिडीओ आहे.

पिवळा रेनकोट परिधान करून लहान मुलगा पावसाचा आनंद लुटताना दिसत आहे. पावसाचा आनंद लुटण्यासाठी तो रेनकोट घालून रस्त्यावर मस्त झोपला आहे. हा व्हायरल होणारा व्हिडीओ नेदरलँडमध्ये शूट करण्यात आला होता. हे पाहून कोणाचेही मन खूश होईल, कारण हे पाहायला खूपच गोंडस आहे.

(हे ही वाचा: ‘या’ व्यक्तीचे हात चालतात रोबोटसारखे, वेग पाहून नेटकरी झाले आश्चर्यचकित !)

(हे ही वाचा: माकडांना फळ खाऊ घालत पोलिसाने जिंकली नेटीझन्सची मनं; व्हिडीओ सोशल मीडियावर viral)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

या क्यूट व्हिडीओला नेटीझन्सकडून खूप पसंती मिळत आहे. व्हिडीओवर असंख्य कमेंटस् करून आपली पसंती दर्शवत आहेत. व्हायरल व्हिडीओ या महिन्याच्या सुरुवातीला बुइटेंगबिडेन ट्विटर अकाउंटवर पोस्ट करण्यात आला होता आणि त्याला २३ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

Story img Loader