Viral video: सोशल मीडियावर नेहमी अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ मजेशीर असतात. तर काही व्हिडिओ बघून अंगावर काटा येतो. लहान मुलांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावं लागतं. त्यांच्याकडे झालेलं थोडसं दुर्लक्ष अनेकदा महागात पडू शकतं. तहानभूक विसरून मुलं वेगवेगळे खेळ खेळत असतात. इमारतीच्या आवारातच खेळत असल्याने पालकही निर्धास्त असतात.
पण मुलांना खेळण्यासाठी पाठवताना त्यांच्यावर लक्ष ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. सोसायटी किंवा इमारतीच्या प्रांगणात खेळणारी आपली मुलं नेमकी कुठं आहेत? ती सुरक्षित ठिकाणी खेळतायत का, यावर पालकांनी नजर ठेवण्याची गरज आहे. बऱ्याचदा खेळतानाच मुलं जखमी होण्याची शक्यता जास्त असते. अशाच एका घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन चिमुकले घराच्या बाहेर खेळत आहेत. यावेळी ते दोघेजण घराच्या बाहेर असलेल्या गटाराजवळ जातात. आणि अचानक एक चिमुकला त्या गटरात उडी मारतो आणि बुडतो. हे पाहून सोबत असलेली चिमुकली घाबरते आणि घरात पळून जाते. आणि वडिलांनी घेऊन येते. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसत असेल तो चिमुकला पाण्यात जीव वाचवण्यासाठी हात-पाय मारत आहे. काही वेळात त्याचे वडिल तिथे येतात आणि गटरात उडी मारुन चिमुकल्याला बाहेर काढतात. यावेळी चिमुकला सुखरुप असल्याचं पाहायला मिळत आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> डाव्या बाजूनं कधीही ओव्हरटेक करु नका; भीषण अपघाताचा थरारक VIDEO पाहून कळेल कारण
लहान मुलांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावं लागतं. त्यांच्याकडे झालेलं थोडसं दुर्लक्ष अनेकदा महागात पडू शकतं. हा व्हिडीओ पाहूनच अंगावर काटा येतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज गेले आहेत. नेटकरीही हा अपघात बघून अवाक झाले आहेत. तर पालकांनी मुलांकडे व्यवस्थित लक्ष देण्याचं आवाहन नेटकरी करत आहेत.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पालकांचं थोडसं दुर्लक्ष मुलांच्या जीवावर बेतू शकतं. त्यामुळे इमारतीच्या बालकनीमध्ये, रस्त्यावर लहान मुलांना एकटे सोडू नका.