सध्या रस्ते अपघातांचं प्रमाण जरा जास्तच वाढत चाललंय. याचे व्हिडीओ आपण अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहिले असतील. त्यामधले काही अपघात हे वाहनचालकांच्या चुकीमुळे होताना दिसतात; तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असे भयंकर अपघात पाहून अक्षरश: अंगावर काटा येतो. रस्त्यावर गाडी चालविताना अनेकांकडून चूक होते आणि ती चूक महागात पडू शकते. अशाच प्रकारे जर एखाद्या आईकडून आपल्याच मुलाचा जीव धोक्यात गेला तर…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या अशाच घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात आईच्या चुकीमुळे लहानगा चिमुकला रस्त्यावर पडला. पुढे नेमकं काय घडलं ते जाणून घेऊ…

हेही वाचा… एका बापाची मजबुरी! कोणत्याच मुलावर ‘हे’ बघायची वेळ येऊ नये; VIDEO पाहून व्हाल निशब्द

व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमधला धक्कादायक प्रकार पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक महिला तिच्या लहानग्या मुलाला स्कूटरवर घेऊन फिरतेय. स्कूटर चालवताना तिने तिच्या मुलाला पुढे उभं करून ठेवलंय. स्कूटर चालवता चालवता अचानक ते लहानगं मूल भररस्त्यात खाली पडतं. मूल खाली पडताच महिला त्याला उचलायचा प्रयत्न करते; पण स्कूटरवर बसून आणि तोल सांभाळून तिला तिच्या मुलाला उचलणं शक्य होत नाही. इतक्यात एक माणूस त्या आई-लेकाच्या मदतीला धावून येतो. चिमुकला खाली पडल्याचं पाहून लगेच तो माणूस त्याची गाडी थांबवतो आणि रस्त्यावर पडलेल्या मुलाला आईच्या स्वाधीन करतो. मुलाला उचलण्याच्या वेळेस महिला तिच्या तोंडात काहीतरी धरते. त्यामुळे ती स्कूटर चालवताना आणि मूल पडल्यावरही स्मोकिंग करीत होती, असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

हा व्हिडीओ @taiwan_memes66 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘आई इतकी घाबरली होती की, ती गाडी कशी उभी करायची हेच विसरली’ अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. तर, या व्हिडीओला तब्बल १९.९ मिलियन व्ह्युज आले आहेत. यादरम्यान ही घटना नेमकी कुठे घडली हे अद्याप कळू शकलेले नाही.

हेही वाचा… सरकत्या जिन्यांवर चढली अन् करू लागली विचित्र प्रकार, शेवटी दोन माणसं आली अन्…, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय घडलं?

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हि़डीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिलं, “त्या आईला तुरुंगात टाकायला हवं” तर दुसऱ्यानं, “जर तुम्ही तुमच्या मुलाची काळजी घेऊ शकत नसाल, तर मूल जन्माला न घातलेलंच बरं”, अशी कमेंट केली. तर एकाने कमेंट करीत लिहिलं, “मुलगा खाली पडला तरी तिला स्मोकिंग करायचं होतं.” तर एक जण म्हणाला, “तिला तिचं मूल नकोसं झालंय, असंच वाटतंय.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Child fell down from the scooter while his mother was driving it viral video on social media dvr