Huge Python grip on child viral video : सापाचं नाव जरी घेतलं, तरी अंगावर शहारा आल्याशिवाय राहत नाही. कारण सापांपासून दोन हात लांबच राहिलेलं चांगलं असतं. कारण सापांसोबत खेळ करणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखंच आहे. विषारी साप असो वा बिनविषारी सापांच्या जवळ न जाण्याच्या सूचना अनेकदा वन विभागाकडून दिल्या जातात. पण काही जण नियमांचे उल्लंघन करून स्टंटबाजी करण्यासाठी सापांना पकडून घरी आणतात. विशेषत: अजगर सापासोबत खेळ करायला काहींना आवडतो. पण हा जीवघेणा खेळ कधी त्यांच्या जीवाला धोका निर्माण करील,याचा नेम नाही. अशाच प्रकारचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. विशाल अजगर एका लहान मुलाला विळखा घालून बसलेला असतो. त्यानंतर जे घडतं ते पाहून तुम्ही थक्क झाल्याशिवाय राहणार नाहीत. कारण अजगराने या लहान मुलाला घट्ट विळखा घातल्याचं या व्हिडीओत दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अजगराच्या विळख्यात सापडल्यानंतर चिमुकल्यानं काय केलं? पाहा व्हिडीओ

फॉरेस्ट अॅनिमल नावाच्या युजरने हा व्हिडीओ इंन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. एक लहान मुलगा अजगराच्या विळख्यात अडकलेला या व्हिडीओत दिसत आहे. सुरुवातीला व्हिडीओ पाहिल्यानंतर अंगावर काटा उभा राहिल्यासारखा वाटतो. पण अजगराच्या विळख्यातून सुटण्यासाठी लहान मुलाने लढवलेली शक्कल पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. भला मोठा अजगर लहान मुलाल विळखा घालून बसलेला असताना त्या मुलाची सुखरुप सुटका होणे, हे अशक्यच असल्यासारखं व्हिडीओच्या सुरुवातीला वाटतं.

पण हा चिमुकला न डगमगता अजगाराच्या विळख्यातून बाहेर येतो आणि थेट त्या अजगराची मान पकडतो. भला मोठा अजगर त्याच्याजवळ बसलेला असतानाही त्या मुलाला जराही भीती वाटत नाही, हे व्हिडीओत पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील. हा थरारक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून अनेकांना व्हिडीओ पाहिल्यानंतर धक्काच बसला आहे.

नक्की वाचा – बापरे! खेळण्यासाठी घरातच आणला विशाल अजगराला, काही सेकंदातच अजगराने खेळ खल्लास केला, पाहा थरारक Video

इथे पाहा व्हिडीओ

अजगर सापासोबत खेळ करणं एका माणसाच्या अंगलट आलं होतं. हा थरारक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. @NarendraNeer007 नावाच्या युजरने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला होता. हा व्हिडीओ पाहून लोकांना आश्चर्याचा धक्का बसला . सोशल मीडियावर अजगराचे अनेक व्हिडीओ व्हायरल झालेले पाहिले असतील. पण हा व्हिडीओ खूपच धक्कादायक आहे. अजगर संकटात सापडल्यावर काही माणसं त्या सापाचा जीव वाचवतात. पण काही जण घरातच अजगरा सापासोबत खेळ करत असतात.

अजगर सापाला घरात कोंडून त्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणतात. असाच एक थरारक व्हिडीओ worldofsnakess या इन्स्टाग्रावर पेजवर शेअर करण्यात आला होता. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये युजरने म्हटलं होतं, “इतर प्राण्यांप्रमाणे या अजगरालाही एकटं राहायचंय. घरी अशा सापांसोबत जीवघेणा खेळ करण्याचा प्रयत्न करु नका. त्यांना फक्त एकटं राहून जंगलात फिरायचं आहे.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Child got stuck inside huge python grip everyone will be shocked after watching this dangerous viral video on instagram nss