Viral Video: आपल्यातील बहुतांश जण विमानाने प्रवास करतात. पण, अनेकदा सीटवरून तर कधी प्रवाशांमध्ये क्षुल्लक कारणांवरून गोंधळ उडतो आणि प्रकरण कधी कधी हाणामारीपर्यंत पोहचते, असे अनेक व्हिडीओ समोर येतात. कधी कधी तर प्रवाशांच्या कृतीमुळे इतरांचा प्रवासही खराब होतो. अलीकडेच याचसंबंधित एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये एक मूल पुढच्या सीटवर बसलेल्या गर्भवती महिलेला त्रास देताना दिसत आहे आणि त्याच्या या वागणुकीवर त्याची आईदेखील दुर्लक्ष करते आहे. नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊ.

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, एक मूल त्याच्या आईबरोबर मागच्या सीटवर बसले आहे. अचानक तो त्याच्या जागेवर उभा राहतो आणि गर्भवती महिलेची खुर्ची जोराने ढकलण्यास सुरुवात करतो. पुस्तक वाचणारी गर्भवती महिला मुलाच्या या कृत्याने अस्वस्थ होते. मुलाचे त्रास देणे इथेच थांबत नाही. तो गर्भवती महिलेकडून पुस्तक हिसकावून घेतो. तिच्या शेजारी बसलेल्या वृद्ध जोडप्यानेही मुलाला थांबविण्याचा प्रयत्न केला; पण तो ऐकत नाही. यादरम्यान मुलाची आई तिच्या मोबाईलमध्ये मग्न आहेत. नक्की काय घडले ते व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.

हेही वाचा…‘नियम म्हणजे नियम…!’ सिग्नल पाहून थांबली ‘गाय’, वाहतूक नियमाचे पालन; VIDEO शेअर करीत पुणे पोलिसांकडून कौतुक

व्हिडीओ नक्की बघा…

शेवटी ती गरोदर महिला उठते आणि महिलेकडे तिच्या मुलाबद्दल तक्रार करते. त्यावर महिलेचे उत्तर अशा प्रकारे येते की, जणू काही तिला काही फरक पडत नाही. त्यानंतर मुलाच्या आईच्या मागे बसलेली व्यक्ती काही सामान काढण्यासाठी घाईघाईने उभी राहते. त्यामुळे मुलाच्या आईची खुर्ची जोरात हलते आणि तिच्या हातातला ज्यूसचा ग्लास तिच्या कपड्यांवर पडतो. ती रागाने उठते आणि त्या व्यक्तीजवळ तक्रार करण्यास सुरुवात करते. त्यानंतर काही क्षणांसाठी तिला आपल्या मुलाने गर्भवती महिलेला दिलेला त्रास आठवतो आणि मग तिला लाजिरवाणेपणा वाटू लागतो.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @fabiosa_kindness_in_action या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. आईने आपल्या मुलाला वेळीच थांबवले असते, तर नंतर तिलासुद्धा या लाजिरवाणेपणाला तोंड द्यावे लागले नसते आणि मुलाच्या वर्तनामुळे आईला लाजिरवाणे वाटले नसते. हा व्हिडीओ मनोरंजनासाठी बनवला असला तरीही यातून दिलेला संदेश अगदीच कौतुकास्पद आहे. व्हिडीओ पाहून नेटकरीसुद्धा विविध कमेंट्स करीत आहेत. त्यातील एका युजरने असे लिहिले, ‘मुलाच्या कृतीसाठी आईला मौल्यवान धडा शिकविणाऱ्या व्यक्तीचे आभार’ आदी अनेक कमेंट्स पोस्टखाली केलेल्या दिसून येत आहेत.