Viral Video: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल ते सांगता येत नाही. पूर्वी सोशल मीडियावर पुणेरी पाट्यांची खूप चर्चा असायची. त्यावरील विनोदी आशय नेहमी व्हायरल व्हायचे. परंतु, अलीकडे शाळेतील मुलांच्या उत्तरपत्रिकेतील उत्तरं, गाड्यांच्या मागचे हटके डायलॉग, जाहिरातींवरील आशयही तितकेच चर्चेत असतात. दरम्यान, आता अशाच एका दरवाजावर लावलेल्या पाटीचा फोटो व्हायरल होतोय; ज्यावर असं काहीतरी लिहिलंय; जे वाचून तुम्हालाही हसू येईल.
आतापर्यंत सोशल मीडियावर अनेक पाट्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत; ज्यात नेहमी अतरंगी पद्धतीने सामाजिक संदेश देणारी वाक्यं लिहिलेली आढळतात. पण, सध्या व्हायरल होत असलेली ही पाटी एका ऑफिसबाहेरची असून, त्यावर असं काहीतरी लिहिलंय; जे पाहून तुम्हीदेखील पोट धरून हसाल. या व्हायरल झालेल्या पाटीवर असं लिहिण्यात आलंय, “येथे बालकामगार काम करीत नाहीत. एवढंच कशाला ज्यांना कामावर ठेवलं आहे, तेही काम करीत नाहीत,” या पाटीवरची ही गमतीशीर वाक्यं वाचून कोणालाही हसू येईल. सध्या हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @ag_creation_004 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर आतापर्यंत एक मिलियनहून अधिक व्ह्यूज आणि आतापर्यंत आठ हजारहून अधिक लाइक्सदेखील मिळाल्या आहेत. त्याशिवाय यावर अनेक नेटकरी कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरनं लिहिलंय, “कामावर तरी येतात का मग?” तर दुसऱ्यानं लिहिलंय, “आमच्या कंपनीतही असंच आहे.” तर आणखी एकानं लिहिलंय, “देवा, आणखी काय काय बघायला लागेल.” आणखी एका व्यक्तीनं लिहिलंय, “नक्कीच पुण्यातली पाटी असेल.”
पाहा व्हिडीओ:
दरम्यान, यापूर्वीदेखील अशा प्रकारच्या अनेक पाट्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. एका फोटोमध्ये क्लासची जाहिरात करण्यात आली होती; ज्यावर हटके पद्धतीचा आशय लिहिण्यात आला होता. तर, आणखी एका व्हायरल फोटोमध्ये लग्नाच्या मंगल कार्यालयाची हटके जाहिरात करण्यात आली होती.