मुलांना शाळेत आणण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, मात्र तरीही आज अशी अनेक मुलं आहेत जी शाळेत येत नाही किंवा त्यांना पालक पाठवत नाहीत. यासाठी सरकारनेही शिक्षकांना घरी पाठवून मुलांना आणि त्यांच्या पालकांना समजवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याचा परिणाम सकारात्मक झाला पण आजही अनेक मुले शाळेत येत नाहीत किंवा त्यांचे पालक त्यांना येऊ देत नाहीत. दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक विद्यार्थी शाळेत येत नाही म्हणून थेट शिक्षकच सर्व मुलांसह त्याच्या घरी पोहोचले. त्यानंतर त्यांनी जे सांगितले ते एकून तुम्हीही शिक्षकांचं कौतुक कराल.
एका मुलासाठी अख्खी शाळा विद्यार्थ्याच्या घरी
उत्तर प्रदेशातील झाशीच्या बाबीना ब्लॉकमधील लकारा प्राथमिक शाळेत असलेले सहाय्यक शिक्षक अमित वर्मांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते आपल्या शाळेतील मुलाच्या घरासमोरच शाळा भरवली आहे. या घरातील एक मूल अनेक दिवसांपासून शाळेत येत नसल्याने शिक्षक अमित वर्मा मुलांसह त्याच्या घरी पोहोचले आहेत. व्हिडिओमध्ये ते म्हणतात की, विद्यार्थी शाळेत येत नाहीतर आम्ही त्याच्या घरी जाऊ आणि यावेळी फक्त अभ्यास होईल आणि त्या विद्यार्थ्याची आई सर्व मुलांना जेवण देईल. हे एकून त्या विद्यार्थ्याच्या आईला चांगलंच टेन्शन आलं. यानंतर शिक्षक अमित वर्मा एक गोष्ट सांगून शाळेत न येणाऱ्या मुलांच्या पालकांना समजावण्याचा प्रयत्न करतात. ही गोष्ट ऐकू तुम्हालाही कौतूक वाटेल.
पाहा व्हिडीओ
शिक्षकांनी गोष्टीतून दिला पालकांना धडा
शिक्षक अमित वर्मा गोष्ट सांगायला सुरुवात करतात, एक गाव असतं, त्या गावात एक अंध महिला आणि एक पुरुष राहत असतात, त्यांना एक लहान मुलगाही होता, मात्र त्याला पूर्णपणे दिसत होतं. ते अंध असल्यामुळे त्यांनी घरात बनवलेलं जेवण कुणीही जनावरं येऊन घेऊन जायचे. यावर गावातील काही लोकांनी त्यांना दरवाजा काठिने वाजवत जा म्हणजे जनावर येणार नाही असा सल्ला दिला..यावर ते तसं करत राहिले..काही वर्षांनी तो मुलगा मोठा होतो, त्याचे अंध आई-वडिलांचाही मृत्यू होते, त्यानंतर त्याचं लग्न होतं. यावेळी लग्नानंतर जेव्हा जेव्हा त्याची बायको जेवण बनवायची तेव्हा तेव्हा तो दरवाजा वाजवायचा, यावर त्याची बायको त्याला म्हणते, काहीतरी काम कर हे असं रोज रोज काय करतोस, त्यावर तो उत्तर देतो की, माझे वडिलही हेच करायचे. यावर पत्नी त्याला म्हणते ते तर अंध होते पण तू नाहीयेस. मग याची काय गरज?
हेही वाचा >> VIDEO: “शेतकऱ्याचे दिवस येणार”, नोकरी सोडून दुग्ध व्यवसायातून महिन्याला लाखोंची कमाई, पाहा कसे केले व्यवस्थापन
मुलांना शाळेत पाठवा नाहीतर आम्ही घरी येऊ
यावर अमित वर्मा सांगतात, याच गोष्टीसारखेच तुम्हीही तुमच्या मुलांना आम्ही नाही शिकलो म्हणून तुम्हीही नका शिकू असा सल्ला देता मात्र त्याचे पुढे त्यांच्या भविष्यावर असे परिणाम होतात. त्यामुळे तुमच्या मुलांना शाळेत पाठवा, आणि जर नाही पाठवलं तर आम्ही येऊ. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.