सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ नेटकऱ्यांना इतके आवडतात की, एखादी व्यक्ती एका रात्रीत स्टार बनते. अशी अनेक उदाहरणं आतापर्यंत समोर आली आहेत. तर दुसरीकडे काही व्हिडीओ पाहिल्यानंतर आश्चर्याचा धक्का बसतो. असे व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असतात. असाच एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक लहानगा चक्का अजगरावर बसून स्वारी करताना दिसत आहे.
साप पाहिला की काही जणांचा थरकाप उडतो. ज्या वाटेने साप गेला आहे, तिथे काही दिवस जाणं देखील टाळलं जातं. अशात एक लहानगा अजगराची स्वारी करत असल्याचं दिसत आहे. लहानगा निर्भयपणे एका महाकाय अजगराच्या वर बसलेले दिसत आहे. सुरुवातीला खराखुरा अजगर नसून खेळण्यातला अजगर असल्याचं वाटतं. पण जेव्हा अजगर तोंड उघडतो तेव्हा कळतं की हा अजगर खरा आहे.
अजगराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. एका युजर्सने लिहिलं आहे की, हा खरा अजगर आहे आणि किती बिनधास्तपणे बसला आहे. तर दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, असे प्रयोग एक दिवस अंगाशी येतील, त्यामुळे काळजी घ्या.