Railway Station Viral Video: रेल्वे प्रवास म्हणलं की आपल्या डोळ्यांसमोर गर्दीने भरलेली ट्रेन आठवते. रेल्वेने प्रवास करताना जितकी गर्दी आपल्याला ट्रेनमध्ये दिसते तितकीच गर्दी स्टेशनवरही पाहायला मिळते. कुणी पुढच्या ट्रेनची वाट पाहत असतं तर कोणी चुकलेल्या ट्रेनमुळे निराश झालेले असतात. अशावेळी अनेकदा रेल्वे स्टेशनवर मुक्कामाचीही वेळ येते. मात्र स्टेशनवर झोपल्यानंतर इतर प्रवाशांची गैरसोय होवू नये म्हणून पोलिस प्रशासन लगेच न झोपण्याचा सल्ला देत असतात. सध्या असाच एक रेल्वे स्टेशनवरील व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पोलिसाने झोपलेल्या लहान मुलाला लाथ मारली आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांची निर्दयी मारहाण कॅमेरात कैद

हा व्हिडीओ उत्तर प्रदेशच्या बेलथरा रेल्वे स्थानकातील असून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता, एक पोलीस स्टेशनवर झोपलेल्या मुलाला लाथ मारत आहे. आजूबाजूला अनेक लोक जमा झाले असून ते हे सर्व पाहत आहेत, तरी पोलीस त्या मुलाच्या अंगावरुन पाय काढत नाही. थोड्यावेळाने ते त्या मुलाला लाथेने उडवताना दिसत आहेत.

हा व्हिडीओ पाहून अनेकजण पोलीस कर्मचाऱ्यावर संतापले असून त्याला नोकरीवरून काढून टाकण्याची मागणी करत आहेत. व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – भर लग्नात नवरदेवाने रागानं नवरीला इतकं फिरवली की स्टेजवरच कोसळली; Video पाहून नेटकरी संतापले

नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप….

अनेकांनी यावर प्रतिक्रिया देताना प्लॅटफॉर्मवर झोपल्याने इतर प्रवाशांची गैरसोय होते परंतु ज्या पद्धतीने लोकांना झोपेतून उठवण्याचा प्रयत्न केला आहे, ते योग्य नसल्याचे अनेकांनी म्हणले आहे. तसेच काही जणांनी माणुसकी आहे की नाही म्हणत पोलिसाच्या कृतीवर संताप व्यक्त केला आहे. 

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Child sleeping at railway station kicked by policeman in up railways replies on video viral on social media srk
Show comments