Viral Post: सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्ट्सच प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय. यात मजेशीर व्हिडीओ, भांडणाचे व्हिडीओ तसेच डान्स व्हिडीओंचं प्रमाण जास्त आहे. पण काही पोस्ट अशाही असतात ज्या नेहमीच काहीतरी शिकवून जातात आणि कायम लक्षात राहतात.

अशीच एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतेय. या पोस्टमध्ये एका लहान मुलाने तरुणीच्या फोनमधला मोमोजचा फोटो दाखवण्याचा आग्रह केल्यावर तरुणी रडायलाच लागली. नेमकं असं घडलं तरी काय? जाणून घेऊया.

हेही वाचा… अजबच! मुंबई लोकलच्या दरवाजावर पठ्ठ्याने चिकटवला फोन अन् गाणी ऐकण्यासाठी केला ‘असा’ जुगाड, VIDEO पाहून नेटकरी म्हणाला, “डब्बा लगेज, अंकल सेवेज”

व्हायरल पोस्ट (Viral Post)

‘!! Keerti !!’ या एक्स अकाउंटवर तरणीने मोमोजचा फोटो शेअर करत याबद्दलचा किस्सा सांगितला. तरुणी म्हणाली की, “मी मोमोजचा फोटो क्लिक करताच एक २-३ वर्षांचा मुलगा माझ्याजवळ आला आणि माझ्या फोनकडे बोट दाखवत मला म्हणाला ‘दिखाओ’ (मला फोटो दाखवा). मी त्याच्याकडे पाहून हसले, ‘ऐसे किसी और का फोन नहीं देखते’ (आपण अशाप्रकारे इतरांचे फोन पाहू नयेत) असे म्हणत मी त्याला नम्रपणे नकार दिला. हे ऐकताच त्याने माझ्याकडे पाहिलं आणि तो जोरजोरात रडू लागला.”

ती पुढे म्हणाली, “मला मुलांनी मोठ्याने रडण्याचा त्रास होत नाही. पण जेव्हा पालकांनी मध्यस्थी केली आणि मला सांगितले की तो फोटो मुलाला दाखव नाहीतर तो असाच रडत राहील, हे ऐकताच मी मुलाचे अनुकरण करत जोरात रडायला लागले.”

माझं वागणं पाहून पालकांना तसेच मुलालादेखील धक्का बसला, आणि तो पुन्हा काही माझ्याजवळ आला नाही. तो माझ्याकडे पाहत होता पण मी त्याच्याकडे पाहिल्यानंतर त्याने तेही सोडून दिलं.

हेही वाचा… रीलसाठी केली हद्द पार! भररस्त्यात झिंज्या उपटणारं भांडण पाहून तरुणीने शूट केला VIDEO; संतप्त नेटकरी म्हणाले,“दररोज असे फालतू…”

युजर्सच्या प्रतिक्रिया (Users Comment)

तरुणीने शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Viral Post) झाली आणि नेटकऱ्यांनी तिच्या अशा प्रतिसादाला दुजोरा दिला. एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिलं, “जर मुलांना त्यांच्या पालकांनी मर्यादा शिकवल्या नाहीत, तर त्यांना शिस्त लागणार नाही” तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “लहान मुलाचं असं वागणं ठीक होतं पण पालक पण असे वागायला लागले तर कसं होईल, तू चांगलाच धडा शिकवलास.”