मुलं केवळ आपल्या आईचा चेहराच ओळखत नाही तर तिचं त्याच्या आजुबाजुला असणं देखील त्यांच्यासाठी ओळखीचं होऊन जातं. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ समोर आला आहे, यात माय-लेकाचे दृश्य पाहून साऱ्यांचेच मन प्रसन्न होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर माय-लेकाची बॉण्डिंग पाहून तुम्ही सुद्धा दोघांच्या प्रेमात पडाल.
या व्हिडीओमध्ये काही महिला डोक्यावरून चेहऱ्यापर्यंत पदर घेऊन पिवळ्या रंगाच्या साडीत बाजुबाजुला बसलेल्या दिसून येत आहेत. तेवढ्यात एक लहान चिमुकला तिथे येतो आणि त्याच्या समोर गोंधळात टाकणारे दृश्य पाहून तो सुद्धा गोंधळून जातो. डोक्यावरून चेहऱ्यापर्यंत पदर घेऊन बसलेल्या महिलांपैकी त्याची आई नेमकी कोणती आहे या विचाराने तो अस्वस्थ होतो. पण शेवटी हा चिमुकला त्याच्या आईला ओळखतोच. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : ट्रेनमध्ये जुगाड करत बनवली ‘स्पेशल सीट’, पुढे जे घडलं ते पाहून हसू आवरणार नाही
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : बर्फाळ जंगलात दोन जण वर्कआऊट करत होते, अचानक मागून अस्वल आला… पाहा हा VIRAL VIDEO
हा क्यूट व्हिडीओ इन्स्टाग्रामवर status.fan.tranding नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. आई ती आईच असते शेवटी असं कॅप्शनमध्ये लिहून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. आतापर्यंत या व्हिडीओला ४ लाख ३४ हजारांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केलं आहे. ही संख्या सातत्याने वाढत आहे. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की आतापर्यंत या व्हिडीओला १९ मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तसंच हा क्यूट व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक सतत त्यांच्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत. लोकांना हा व्हिडीओ खूप आवडला आहे.