Viral Video : सोशल मीडियावर सध्या दिवाळीचे अनेक व्हिडीओ समोर येत आहे. बाजारपेठांमधील गर्दीचे व्हिडीओ, मिठाईच्या रेसिपीचे व्हिडीओ, कपड्यांचे आणि दागिन्यांचे एकापेक्षा एक हटके डिझाइन्सचे व्हिडीओ, भेटवस्तू तसेच दिव्यांच्या डिझाइन्सचे व्हिडीओ, रांगोळ्यांचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. अनेक जण दिवाळी निमित्त जुन्या आठवणींना उजाळा देत आहे. बालपणींच्या आठवणी ताज्या करत आहे. पूर्वी दिवाळी कशी साजरी केली जायची, हे व्हिडीओच्या माध्यमातून शेअर करताना दिसत आहे. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला शंभर टक्के तुमचे बालपण आठवेल. या व्हायरल व्हिडीओमध्ये बंदुकीच्या टिकल्या दाखवल्या आहेत. तुम्ही कधी बालपणी या बंदुकीच्या टिकल्या फोडल्या का?
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला बंदुकीच्या टिकल्यांचे छोटे पॅकेट दिसेल. या पॅकेटमध्ये टिकल्यांचे रोल आहेत. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी या टिकल्या फोडल्या असतील. लहानपणी लहान मुलांना छोटे फटाके म्हणून या बंदुकीच्या टिकल्या द्यायचे आणि लहान मुले आवडीने या टिकल्या फोडायचे. या टिकल्या फोडताना एक वेगळा आनंद असायचा. हा व्हिडीओ पाहून अनेकांना त्यांचे बालपण आठवेल. या व्हिडीओवर लिहिलेय, “तुम्हाला हे अजूनही आठवतं का?”
हेही वाचा : Video : “आताच्या पोरांना काय कळणार आहे दिवाळी म्हणजे काय असते?” 90’sच्या तरुणाने सांगितल्या जुन्या आठवणी
पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)
हेही वाचा : Diwali Wishes 2024 : दिवाळीच्या द्या प्रियजनांना हार्दिक शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक हटके मराठी मेसेज
that_relatablegirl या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “ते पण काय दिवस होते” तर एका युजरने लिहिलेय, “आठवणी” आणखी एका युजरने लिहिलेय, “खरंच त्या दिवसांची खूप आठवण येते.”
अनेक युजर्सना हा व्हिडीओ पाहून जुने दिवस आठवले. काही युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.