आनंद ही अशी गोष्ट आहे जी पैश्याने कधीच विकत घेता येत नाही. पैसा नसेल तरी व्यक्ती आनंदी राहू शकते पण आनंदी राहता यायला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीतील आनंद कसा घ्यावा हे या चिमुकल्यांकडून शिकले पाहिजे.
तुम्ही कधी जत्रेतील आकाश पाळण्यात बसला आहात का? बसला असाल तर तुम्हाला आकाश पाळण्यात बसण्याची मज्जा काय असते चांगली माहित असेल. हीच मज्जा अनुभवण्यासाठी चिमुकल्यांनी भन्नाट जुगाड केला आहे. लाकूड आणि पोते वापरून चिमुकल्यांनी छोटासा आकाशपाळणा तयार केला आहे. चिमुकल्यांचा आकाशपाळण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर जुगाडचे कित्येक व्हिडीओ व्हायरल होत असतात पण असा व्हिडीओ तुम्ही क्वचितच पाहिला असेल. व्हायरल व्हिडीओमध्ये काही लहान मुले मुली एका लाकडी आकाशपाळण्यात बसण्याचा आनंद घेत आहे. चिमुकल्यांनी जुगाड करून लाकूड आणि पोते वापरून हा आकाश पाळणा तयार केल्याचे दिसते. पोत्यामध्ये दोन मुले बसलेली आहेत आणि दोन मुले पाळणा फिरवत आहे. जत्रेतील आकाशपाळण्याप्रमाणेच हा पाळणा गोल गोल फिरवत आहे. व्हिडीओ पाहून लोकांना डोळ्यावर विश्वास बसत नाहीये. कित्येका ही कल्पना मुलांना कशी सुचली याचे कौतूक वाटत आहे.
हेही वाचा – शुभमन गिलने जिंकले नेटकऱ्यांचे मन! चाहत्याच्या इंस्टाग्राम रीलवर कमेंट करत दिला मोलाचा सल्ला, Post Viral
इस्टाग्रामवर indurabat नावाच्या पेजवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “अरे यार लहानपणी हे करायचेच राहून गेले.” व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओवर लोक कमेंट करून आश्चर्य व्यक्त तरत आहेत. एकाने लिहिले की,”लहानपणी मला ही कल्पना का नाही सुचली” तर दुसऱ्याने लिहिले की, हे कोणत्या शास्त्रज्ञांची मुले आहेत भाऊ, हे नक्कीच काहीतरी मोठा घोळ घालतील.” तिसरा व्यक्ती म्हणाला, “भारतात कौशल्याची कमतरता नाही.” चौथ्याने लिहिले, हे टॅलेंट देशाबाहेर नाही जायला पाहिजे”