लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच नाचायला प्रचंड आवडते. एखाद्याला नाचताना पाहूनही आपल्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद येतो. सोशल मीडियावर अनेक लोक नृत्य करतानाचे व्हिडिओ शेअर करतात. कोणी लग्नामध्ये नाचताना दिसते तर कोणी आवडत्या गाण्यावर थिरकताना दिसते. कोणी एखादे पारंपारिक नृत्य सादर करताना दिसते. असाच एक नृत्य प्रकार म्हणजे लावणी. लावणी ही महाराष्ट्रातील लोकप्रिय लोककलेचा प्रकार आहे. लावणी नृत्य सादर करणे हे वाटते तेवढे सोपे नाही. हे कौशल्य आहे जे मेहनत घेऊन आत्मसात करता येते. सोशल मीडियावर अनेत कलाकार, उत्साही तरुण मंडळी किंवा लहान मुलं लावणी सादर करताना दिसतात. सध्या लावणी सादर करणाऱ्या चिमुकल्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चिमुकल्यांची अफलातून लावणी

व्हायरल व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा आणि त्याच्यापेक्षा वयाने लहान मुलगी लावणी सादर करत आहे. मंदनमंजिरी या चित्रपटातील गाण्यावर दोघांनी सुंदर नृत्य सादर केले आहे. दोघांच्या चेहऱ्यावरील हावभाव अत्यंत मोहक आहेत. गाण्याच्या तालावर त्यांची पाऊले अलगदपणे थिरकत आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने मुख्य भूमिका साकारलेला चित्रपट फुलवंतीमधील हे गाणे आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून अनेकांना या गाण्यावर नृत्य सादर केले आहे. पण व्हायरल व्हिडीओमधील दोन चिमुकले थेट प्राजक्ता माळीला टक्कर देत आहे. दोघांमधील जुगलबंदी पाहायला नेटकऱ्यांना मज्जा येत आहे. व्हायरल व्हिडिओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे.

हेही वाचा – “एक चूक अन् खेळ खल्लास!” भरधाव वेगाने आला, अचानक घसरली बाईक, रस्ता ओलांडणाऱ्या शाळकरी मुलींना…थरारक अपघाताचा Video Viral

व्हिडिओ इंस्टाग्रामवर vihaan_24014 नावाच्या खात्यावर पोस्ट केला आहे. व्हिडिओला जवळपास ५ लाखांपेक्षा जास्त लोकांनी पसंती दर्शवली आहे. व्हिडीओवर अनेंकानी कमेंट करत त्यांचे कौतुक केला आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये कमेंट करताना एकाने कमेंट केली की, “दोघेही कमाल!”

काही लोकांना दोघांमधील मुलांचा डान्स जास्त आवडला त्यांनी त्यांचे तोंडभरून कौतुक केले आहे.

एकाने कमेंट केली की, “मुलगा २६२ मतांनी आघाडीवर”

दुसऱ्याने कमेंट केली की,” मुलगा अत्यंत चांगले नृत्य सादर केले”

आणखी एक जण म्हणाला की,”तो मुलगा खूप चांगले नाचत आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या कुटुंबाला आधार देत आहे ते आज मी पाहिलेली सर्वोत्तम गोष्ट आहे”