Viral video : तुमच्या घरात जर लहान मूल असेल, तर ही बातमी तुम्ही आवर्जून वाचली पाहिजे. अलीकडच्या काळात आई-वडील आपापल्या कामात व्यग्र असतात. परिणामत: कित्येकदा त्यांचे लहान मुलांकडे दुर्लक्ष होताना दिसते. त्यामुळे अनुचित प्रकार घडल्याचे प्रसंग अनेकदा समोर आले आहेत.
लहान मुलांकडे लक्ष द्या!
घरात लहान मूल असेल, तर आपल्याला सतत सावध राहावं लागतं. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे लहान बाळं रांगताना, अगदी चालायला लागल्यावरही हाताला मिळेल ती प्रत्येक गोष्ट तोंडात घालतात. त्यामध्ये अनेकदा कागद, प्लास्टिक, कपडे अशा कोणत्याही गोष्टीचा समावेश असू शकतो. इतकेच नाही, तर मुलं कचरा, चपला किंवा स्टीलच्या टोचतील अशा कोणत्याही वस्तू तोंडात घालायचे सोडत नाहीत. या वस्तू लहान आकाराच्या असतील, तर त्या थेट घशात जाऊन अडकण्याची किंवा पोटात जाण्याची भीती असते. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये बाळानं खेळता खेळता एक वस्तू तोंडात घातली आणि ती त्याच्या तोंडात अडकली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तोंडात अडकले झाकण
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका लहान बाळाच्या तोंडात बाटलीचं झाकण अडकलं आहे. त्यामुळे ते बाळ वेदनेनं रडतानाही दिसत आहे. बाळाची आई झाकण त्याच्या तोंडातून काढण्याचा प्रयत्न करते आहे; मात्र ते झाकण त्याच्या तोंडात अडकलं आहे. शेवटी बऱ्याच प्रयत्नांनंतर अखेर आईला ते झाकण बाळाच्या तोंडातून काढण्यात यश येतं. बाळही मग रडायचं थांबतं. हा गंभीर प्रकार तुमच्याही घरात होऊ शकतो. त्यामुळे लहान मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> प्लॅटफॉर्मवर उभ्या प्रवाशाची चालत्या ट्रेनमधून कॉलर पकडली; फरफटत नेलं अन्…रेल्वे स्टेशनवरचा थरारक VIDEO व्हायरल
घरात लहान मुलांकडे डोळ्यांत तेल घालून लक्ष द्यावं लागतं. कारण- लहान मुलं काय खातील, काय तोंडात घालतील, याचा नेम नसतो. कोणी सेफ्टी पिन गिळली, कोणाच्या नाकात शेंगदाणा अडकला, तर कोणी खेळण्यातील बटण, बॅटरी गिळली, असे अनेकविध अजब प्रकार पाहायला मिळतात. लहान मुलांच्या अन्ननलिका किंवा श्वसननलिकेत एखादी वस्तू अडकल्यास गंभीर गुंतागुंत निर्माण होऊ शकते.
लहान मुलांकडे लक्ष द्या
सध्या सकाळी कामावर ते रात्री घर, असं बहुतेक सर्वांचंच आयुष्य धावपळीचं झालं आहे. महिलादेखील घरकामे सांभाळून जॉबही करत असतात. मात्र, अशा या परिस्थितीत लहान मुलांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अशा घटना उघडकीस येत आहेत. मात्र, अशा घटना वारंवार होऊ नयेत आणि गंभीर परिस्थिती उदभवू नये यासाठी पालकांनी मुलांकडे दुर्लक्ष होणार नाही या काळजी घ्यायला हवी.