Viral Video : आईवडिल मुलांच्या सुखासाठी आणि आनंदासाठी वाट्टेल ते प्रयत्न करतात. मुलांचे भले व्हावे, त्यांना सर्व सुख सोयी मिळाव्यात म्हणून रात्रंदिवस राबतात पण अनेकदा मुले वाईट संगतीमुळे चुकीच्या गोष्टीच्या आहारी जातात. व्यसन करतात एवढंच काय तर अनेकदा आत्महत्या सारखे कठोर पाऊल उचलतात. तो क्षण एका आईवडिलांसाठी सर्वात कठीण क्षण असतो. ती वेळ कोणत्याही आईवडिलांवर येऊ नये, यासाठी एक समाजसेवक म्हणून काम करत असलेले हंकारे शाळकरी मुलांबरोबर विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधतात आणि त्यांना चांगले मार्गदर्शन करतात. त्यांच्या एका कार्यक्रमातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की ते मुलांना व्यसन करणार नाही आणि आयुष्यात कधी आत्महत्या करणार नाही, अशी शप्पथ घ्यायला सांगतात. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

मुलांनी डोक्यावर हात ठेवून घेतली शपथ

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला काही शाळकरी मुले दिसतील. त्यांनी डोक्यावर हात ठेवले आहे. वसंत हंकारे हे मुलांना शपथ घेण्यास सांगतात. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की ते म्हणतात, “आला का बाप डोळ्यासमोर? कळकळून मिठी द्या त्या बापाला आणि पोरा सांग, पप्पा माझा जीव जाईल पण मी व्यसन करणार नाही पप्पा, मी कधीच आत्महत्या करणार नाही पप्पा, तुमची मान झुकेल, असे कुठलेच कृत्य करणार नाही. पप्पा आय लव्ह पप्पा तुमच्यावर खूप जीव आहे पप्पा.. माझा तुमच्यावर खूप जीव आहे पप्पा, मी नाव रोशन करणार मी आत्महत्या करणार नाही पप्पा. घ्या शप्पथ घ्या पोरांनो, शप्पथ घ्या आज नाही तर परत कधीच नाही. हात खाली घ्यायचे.”
त्यानंतर मुले हात खाली घेतात पण मुलांच्या डोळ्यात पाणी दिसून येते. मुले भावुक झालेली दिसून येतात.

हंकारे पुढे म्हणतात, ” सब मंगल है सब आनंद है . तेरा मंगल हो मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो. जिस बापने मुझे जन्म दिया उस बाप का मंगल हो. जिस माँ ने मुझे जन्म दिया उस माँ का मंगल हो. तेरा मंगल हो मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो. ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आणि आनंदात ठेव”
हा व्हिडीओ पाहून कोणीही भावुक होईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ

vasant_hankare_3232 यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पप्पा मी कोणतच व्यसन करणार नाही..मी आत्महत्या करणार नाही…!!” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “तुमच्या कार्याला मनापासून सलाम सर” तर एका युजरने लिहिलेय, “प्रत्येक शाळेत हा कार्यक्रम करायला पाहिजे” आणखी एका युजरने लिहिलेय, “देव माणूस”

Story img Loader