Indian Railway: प्रवासादरम्यान बस किंवा रेल्वेने अनेक जण प्रवास करतात. प्रवास करताना आपल्या बरोबर लहान मुलेही असतात. पाच वर्षांपेक्षा कमी वयाचे मुलं असेल तर त्याचे तिकीट काढले जात नाही. कारण – रेल्वे आणि बसच्या काही नियमांनुसार आपण त्यांना तिकीट न काढता आपल्या बरोबर घेऊन जाऊ शकतो. पण, अनेक प्रवाशांच्या मनात याबद्दल अजूनही शंका आहे. तर आज याचसंबंधित एक पोस्ट भारतीय रेल्वेने शेअर केली आहे.
भारतीय रेल्वेने एक फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये स्टेशनचे कार्टून चित्र चित्रित केलं आहे. प्रवास करणारी एक व्यक्ती तिकीट तपासणाऱ्या अधिकाऱ्याला (टीसी ) ५ वर्षांखालील मुलांसाठी तिकीट बुक करता येतील का? असा प्रश्न विचारताना दिसते आहे. तर या कार्टून चित्राद्वारे भारतीय रेल्वे यांनी उत्तर दिल आहे की, ५ वर्षांखालील मुलांसाठी सुद्धा तिकीट बूक केले जाऊ शकते आणि सीट बूक करण्यासाठी इतर प्रवाशांसारखेच तुम्हाला पूर्ण भाडे द्यावे लागेल. भारतीय रेल्वेने शेअर केलेली पोस्ट एकदा तुम्हीसुद्धा बघा.
हेही वाचा…रिक्षाप्रवास ठरला खास ! महिलेला ऑटोरिक्षा चालवताना पाहून तरुणीला वाटला अभिमान…
पोस्ट नक्की बघा :
रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून भारतीय रेल्वेने अनेक नियम तयार केले आहेत. रेल्वे प्रवासादरम्यान अनेकदा लहान मुलेही बरोबर असतात. तर त्यांचा प्रवास देखील सुरक्षित आणि सोयीस्कर व्हावा यासाठी तुम्ही त्यांचे स्वतंत्र तिकीट बूक करू शकता. तसेच जर तुम्हाला त्यांच्यासाठी तिकीट बूक करायची नसेल तर तुम्ही त्यांना तुमच्या बरोबर मोफत सुद्धा घेऊन जाऊ शकता.
सोशल मीडियावर ही पोस्ट भारतीय रेल्वे यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) @NWRailways या अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. त्यांनी एक कार्टून चित्र एडिट करून प्रवाशांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर अगदीच खास पद्धतीत दिले आहे ; जे सोशल मीडियावर अनेकांच लक्ष वेधून घेत आहे.