Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ इतके हृदयस्पर्शी असतात की पाहून डोळ्यांत पाणी येतं. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काही चिमुकले एका शोरुमच्या बाहेर बसून टिव्ही पाहताहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही कुणालाही वाटेल की आनंदी कसं राहावं हे त्यांच्याकडून शिकावं.
आपण नेहमी तक्रार करत असतो. मला हे मिळाले नाही किंवा ते मिळाले नाही.खरं तर आपण अनेक गोष्टी जवळ असताना त्यात समाधानी राहत नाही पण तुम्हाला हा व्हिडीओ पाहून समजेल आपल्याजवळ जे आहे त्यामध्ये आनंदी कसे राहावे.
हा व्हायरल व्हिडीओ एका इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या शोरुमच्या बाहेरचा आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की वस्तू खरेदीसाठी लोकांना आकर्षित करण्याकरीता शोरुमच्या बाहेर टिव्ही लावली आहे पण व्हिडीओत दिसेल की या टिव्हीसमोर काही चिमुकले मनसोक्त टिव्ही बघण्याचा आनंद लुटताना दिसत आहे. रस्त्यावर शोरुमच्या बाहेर बसून हे चिमुकले टिव्ही पाहत आहे. विशेष म्हणजे शोरुमच्या मालकाने चिमुकल्यांसाठी टिव्हीवर खास कार्टून चॅनल लावले आहे. हे मुले टिव्ही पाहण्यात खूप मग्न दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल.
हेही वाचा : शाळेचे दिवस परत कधीच येत नाही! तुफान डान्स करणाऱ्या शाळकरी मुलांचा VIDEO होतोय व्हायरल
currentaffairs.marathi या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आयुष्य खूप सुंदर आहे फक्त जगायला शिका आणि स्वतःवर प्रेम करायला शिका !”
व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “माणसाने आहे त्या गोष्टींमध्ये सुख मानले की अपेक्षांचा भार वाढत नाही” अनेक युजर्सनी शोरुम मालकाचे कौतुक केले आहे.