गेल्या दोन दिवसापासून सुरु असलेल्या तुफान पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी साचल तर अनेकांची पूर्ण घरचं वाहून गेली. दरवर्षी अशा घटना घडतातच. याचे व्हिडिओसुद्धा व्हायरल होतात. यातून अनेकदा कोण कुठे कस अडकल, कोण कसं वाहून गेलं याचेच जास्त व्हिडिओ असतात. अशातच काल पासून एका भावाबहिणीच्या जोडीचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतं आहे. व्हिडिओ बघिल्यावर एकदातीच हा व्हिडिओ एखाद्या पोलिसाच्या घरातील आहे अस दिसून येत आहे. या व्हिडिओवर सोशल मिडीयावर समिश्र प्रतिकिया येत आहेत. मुंबई स्पिरीटच्या नावाखाली दरवर्षी हे पाणी तुंबण आम्ही का सहन करायचं? असा प्रश्नही लोक विचारत आहेत.

काय आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये?

या व्हायरल व्हिडिओमध्ये भावाबहिणीची जोडी बेड वर बसून काठी हातात घेऊन होडी चालवत आहे. ही काठी म्हणजे पोलीसांची काठी आहे हे व्हिडिओतून लक्षात येत. सोबतीला नाखवा बोटीन फिरवाल का हे गाण आहेच. बॅगराउंडला असलेल्या या गाण्यासोबत दोघ स्वतःही गाण गात आहेत. या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की पावसामुळे त्यांच्या घरात पाणी तुंबल आहे. यामुळे सगळ समान वरती ठेवून समान वाचवायचा प्रयत्नही केला आहे.

नेटीझन्सच्या मिश्र प्रतिक्रिया!

अवघ्या१३ सेकंदाच्या या व्हिडिओने काल पासून सोशल मिडियावर धुमाकूळ घातला आहे. वेगवेगळ्या अकाऊट वरून हा व्हिडिओ शेअर होत आहे. Dadar- दादर या फेसबुक पेजने शेअर केलेल्या या व्हिडिओला त्यांनी ‘आज “मुंबईकरांनी प्रशासनाला मारलेला टोमणे पाहा – पंथनगर पोलीस वसाहत बिल्डिंग क्रमांक ६४ मधलं हे कुटुंब आहे “या कल्पनेला १०१ तोफांची सलामी” अशा कॅपशनसह देत हा व्हिडिओ पोस्त काल पोस्ट केला होता. या व्हिडीओला आत्तापर्यंत २ हजार ८०० लोकांपेक्षाही लाईक केला आहे. तर दीड हजार लोकांनी शेअर केला आहे. यावर आतापर्यंत जवळ जवळ दोनशे कमेंट्स आहेत. नंदू चव्हाण या युजरने “आपण किती हतबल आहोत, गेली २५ वर्षे हेच चालू आहे” अशी कमेंट केली तर सुनील श्रोत्री या युजरने “BMC आणि राज्य त्यांच्याच ताब्यात तरी सुधारणा नाही. अशीच परस्थिती राहिली तर कधीच सुधारणा होण्याची शक्यता वाटत नाही” अशी प्रतिक्रिया नोंदवली. काहींनी मात्र अशा वेळातही मुल पोझीटीव्ह राहत आहेत हे बघून छान वाटलं अस म्हणत आहेत.