स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा आनंद लुटण्यात मग्न असणा-या जोडप्यावर अचानक मगरीने हल्ला चढवला. काळजाचे ठोके चुकवणारे हे सीसीटीव्ही फुटेज इंटरनेटवर व्हायरल झाले आहे. झिम्बॉब्वेमधल्या घरातील हा व्हिडिओ आहे. या घराच्या स्विमिंग पूलमध्ये जोडपे पोहण्याचा आनंद घेत होते. मात्र अचानक मगरीने त्यांच्यावर हल्ला चढवला. घरच्या स्विमिंग पूलमध्ये अचानक आलेल्या पाहुण्याला पाहून या दोघांचाही चांगलाच थरकाप उडाला. पण संकटकाळी मात्र या तरूणीच्या प्रियकराने आपल्या प्रेयसीला स्विमिंग पूलमध्ये सोडूनच पळ काढला. त्याचवेळी तिथे उपस्थित असलेल्या आणखी एका तरुणाने प्रसंगावधानता दाखवत या मगरीचे लक्ष विचलित करून तरुणीला तिच्या मगरमिठीतून बाहेर काढले. या हल्ल्यातून हे जोडपे सुदैवाने वाचले असून त्यांना किरकोळ ईजा झाली आहे. पण सोशल मीडियावर मात्र संकटकाळी प्रियकर सोडून गेल्याने त्याच्यावर चांगलीच टिका होत आहे. आतापर्यंत सोशल मीडियावर लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. गेल्या वर्षभरात झिम्बॉब्वेमध्ये फारच कमी पर्जन्यवृष्टी झाली आहे. त्यामुळे येथले काराबीया तलाव हे पूर्णपणे आटले आहे. या तलावात राहणा-या मगरींचे जीवन धोक्यात आले आहेत. त्यामुळे या मगरी निवा-यासाठी रहिवाशांच्या बगीचे किंवा स्विमिंगपूलचा आसरा घेतात. तेव्हा ही मगर अशीच नजर चुकवून या पूलमध्ये लपून बसल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Story img Loader