तुम्ही सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. मात्र, आम्ही तुम्हाला असा व्हिडिओ दाखवणार आहोत जो तुम्ही याआधी क्वचितच पाहिला असेल. ट्विटरवर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ चिंपांझीचा आहे जो पाहून तुम्ही थक्क व्हाल. या व्हिडीओमध्ये चिंपाझी पिझ्झा डिलिव्हरी घेताना दिसय आहे. या व्हिडिओला सोशल मीडियावर खूप पसंती मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये एक डिलिव्हरी बॉय पिझ्झा डिलिव्हरी करण्यासाठी घराच्या दारात पोहोचताना दिसत आहे. डिलिव्हरी बॉय घराची बेल वाजवतो आणि त्याच्या बॅगेतून पिझ्झाचे पॅकेट काढतो. एकदा बेल वाजवल्यानंतर कोणी बाहेर येत नाही तेव्हा डिलिव्हरी बॉय पुन्हा बेल वाजवतो. त्यांनंतर ते दार माणूस नाही तर चिंपांझी उघडतो. एवढेच नाही तर तो डिलिव्हरी बॉयला पैसे देतो आणि पिझ्झा घेऊन दरवाजा बंद करतो. चिंपांझींना असे करताना पाहून यूजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. डिलिव्हरी बॉय देखील घाबरतो आणि तिथून पळून जातो.

( हे ही वाचा: आलिया-रणबीरच्या ‘Kesariya’ चा भोजपुरी व्हर्जन व्हायरल; लोकांना ओरिजनल गाण्यापेक्षा जास्त आवडतोय हा Video!)

चिंपाझीने पिझ्झा घेतानाचा व्हिडिओ एकदा पाहाच

( हे ही वाचा: भररस्त्यात माणसांप्रमाणे का भांडू लागले दोन अस्वल? अचंबित करणारा Viral Video एकदा पाहाच)

व्हिडिओला १३ दशलक्ष व्ह्यूज मिळाले

हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे, तो ट्विटरवर @closecalls7 नावाने शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ १७ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. एवढेच नाही तर त्याला अडीच लाखांहून अधिक युजर्सनी लाईक केले आहे आणि ३४ हजार युजर्सनी रिट्विट केले आहे.