चीन आणि जपानसह कित्येक देशांची लोकसंख्या वेगाने वाढत आहे आणि काम करणाऱ्या वयातील लोकसंख्या कमी होत आहे. या समस्येचा सामना करण्यासाठी सरकारने लोकांवर मुलं जन्म देण्यासाठी दबाव टाकला आहे. त्यासाठी सरकारतर्फे कित्येक प्रकारे प्रोत्साहन दिले जात आहे. काही ठिकाणी लाखो रुपये देखील दिले जात आहे. पण चीनमधील एक ट्रॅव्हल कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना सर्वात आगळी वेगळी ऑफर घेऊ आली आहे. कंपनीच्या माहितीनुसार, १ जुलैपासून ते आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना जवळपास ५.६६ लाख रुपये म्हणजेच ५००,००० युआन देणार आहे ज्यांचे मुलं आहे. प्रत्येक मुलं ५००,००० रुपयांसाठी पात्र असेल.
तरुणांमध्ये मुले होण्याची इच्छा वाढवणे हा यामागचा उद्देश आहे.
कोणत्याही खासगी कंपनीचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा उपक्रम आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, Trip.com चे कार्यकारी अध्यक्ष जेम्स लियांग म्हणाले, “मी नेहमीच असे सुचवले आहे की, ”सरकारने अधिक मुलं असलेल्या कुटुंबांना मदत करावी. त्यांनी सर्व प्रकारच्या सुविधा, विशेषत: पैसे द्यावेत, जेणेकरून तरुणांमध्ये अधिक मुलं जन्माला घालण्याची इच्छा होईल. खासगी कंपन्या या प्रयत्नात नक्कीच सहभागी होतील. जगातील सर्वात मोठ्या ऑनलाइन ट्रॅव्हल एजन्सीपैकी एक असलेल्या Trip.com चे जेम्स लिआंग म्हणाले, “आम्ही जगभरातील आमच्या कर्मचार्यांच्या पोटी जन्मलेल्या प्रत्येक मुलाला पाच वर्षांसाठी दरवर्षी १०,००० युआन देण्याचा निर्णय घेतला आहे. या मूलभूत अनुदानांतर्गत असेल. कंपनी या उपक्रमावर १ अब्ज युआन खर्च करेल.
हेही वाचा – Zomatoवर आता एकाच वेळी वेगवेगळ्या रेस्तरॉंमधून करू शकता ऑर्डर, कसे ते जाणून घ्या
चीनमध्ये वृद्धांची संख्या वाढत आहे
१९८० ते २०१५ या काळात चीनचे एक मूल धोरण लागू होते. परिणामी, तज्ञांचा असा विश्वास आहे की चीन समृद्ध होण्याआधी एक वृद्ध समाज होईल, कारण त्याचे कार्यबल कमी होत आहे. वृद्ध लोकांवर होणारा खर्च वाढत आहे. चीनचा जन्मदर २०२१ मध्ये ७.५२ वरून गेल्या वर्षी १००० लोकांमागे ६.७७ इतका घसरला आणि एक विक्रम नोंदवला. अधिकाऱ्यांनी सांगितले की २०२१ मध्ये जोडप्यांना जास्तीत जास्त तीन मुलं होऊ शकतात. मात्र, विविध कारणांमुळे तरुणांना मूल जन्माला घालण्यात इंटरेस्ट दाखवत नाही. त्यामुळे सरकारने विविध योजना जाहीर केल्या आहेत. मुलांची काळजी घेणे, त्यांना शिकवणे हे त्यांच्या नियंत्रणाबाहेरचे आहे, असे तरुणांना वाटते.
हेही वाचा – क्षणार्धात सरड्यासारखा रंग बदले ‘ही’ कार, १ कोटींपेक्षा जास्त लोकांना पाहिला व्हायरल व्हिडिओ
९ ते १२ महिन्यांची रजाही उपलब्ध आहे
याआधी, टेक कंपनी बीजिंग डाबिनॉन्ग टेक्नॉलॉजी ग्रुपने तिसरे अपत्य जन्माला घालणाऱ्या कर्मचाऱ्यांना ९००,००० युआन म्हणजेच सुमारे ११.५० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. नऊ महिन्यांची रजा देण्याबाबतही त्यांनी नमूद केले. महिला कर्मचाऱ्यांनाही १२ महिन्यांची रजा देण्यात आली होती. विशेष म्हणजे, चीनमध्ये मुलांचे बोनस, वाढीव सशुल्क सुट्ट्या, कर सवलत आणि मुलांच्या संगोपनासाठी अनुदाने यासारखे प्रोत्साहन दिले जात आहेत.