सोशल मीडियावर अनेक जोडप्यांच्या ब्रेकअपशी संबंधित घटना व्हायरल होत असतात. यातील काही घटना मजेशीर असतात तर काही धक्कादायक. सध्या अशीच एक विचित्र आणि धक्कादायक घटना व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका तरुणीने तिच्या प्रियकराशी ब्रेकअप झाले म्हणून चक्क स्वत:चे अंत्यसंस्कार केले आहेत. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे
मिळालेल्या माहितीनुसार, ब्रेकअप झालं म्हणून अंत्यसंस्काराचे आयोजन करणाऱ्या २५ वर्षीय तरुणीचे नाव वांग असं आहे. ती चीनच्या सिचुआन प्रांतात राहते. शिवाय आश्चर्याची बाब म्हणजे वांगने तिच्या मित्रांना अंत्यसंस्कारासाठी येण्याचे आमंत्रण दिले होते. तर वांग आणि तिचा प्रियकर तीन वर्षापासून एकत्र होते, मात्र काही महिन्यांपूर्वी दोघांचे ब्रेकअप झालं.
हेही पाहा- लोकांनी चक्क रस्त्याचीच केली चोरी, व्हायरल VIDEO पाहून डोकंच धराल
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, वांगने सांगितलं की, ती एका लग्नसोहळ्यांला गेली होती, यावेळी मित्रांनी तिच्या लग्नाचा विषय काढला, ज्यामुळे तिला खूप वाईट वाटलं आणि तिने आपल्या ब्रेकअपची तुलना मृत्यूशी केली. यानंतर तिने प्रियकराशिवाय नवीन आयुष्याची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. मात्र जुन्या आयुष्याला निरोप देण्यासाठी तिने चक्क स्वत:चे अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. तिने अंत्यसंस्कारसाठी मित्रांना देखील आमंत्रण दिलं आणि एका फुलांच्या दुकानात अंत्यसंस्कारचा कार्यक्रम आयोजित केला होता.
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल –
वांगच्या या अनोख्या अंत्यसंस्काराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामध्ये बेडवर मेणबत्त्या पडलेला दिसत होत्या तर तिचे मित्र तिच्यावर वाकून फुले वाहनाता दिसत आहेत. जे एकाद्या खऱ्या अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमासारखे दिसत आहे. वांगने सांगितलं की, तिच्या प्रियकराचे आई-वडील लग्नासाठी तयार नसल्याने दोघांना वेगळं व्हावं लागलं. तर स्वतःचे अंत्यसंस्कार केल्याचा आपणाला कोणताही पश्चात्ताप नाही. आता मी माझं आयुष्य जगायला मोकळी झाल्याचंही वांग म्हणाली. मात्र, चीनच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Douyin वर लोकांनी या घटनेवर आपली मतं व्यक्ती केली आहेत. एका युजरने लिहिलं, “लोक स्वतःचे अंतिमसंस्कार करत आहेत, हे अशुभ आहे.” आणखी एकाने लिहिलं, “हे अंतिमसंस्कार तिचे नव्हते तर तिच्या तीन वर्षांच्या प्रेमसंबंधांचे होते.”