लोकसंख्या वाढली. वस्ती वाढली. मग लोकांनी जंगलांवर अतिक्रमण केलं. हिरवीगार जंगलं तोडली आणि काँक्रिटचं जंगल उभारलं. टोलेजंग इमारती बांधल्या गेल्या. जगाच्या नकाशावर असे अनेक देश आणि शहरे आहेत ती आज प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहेत. चीनमध्ये ही समस्या गंभीर आहे. लोकसंख्येच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर असलेला चीन प्रदूषणाच्या यादीतही अव्वल आहे. बीजिंग हे शहर जगातील सर्वात प्रदूषित शहर असल्याचं नुकतंच समोर आलं आहे. येथील लोकांना मोकळा श्वास घेणंही मुश्किल झालं आहे. झाडे या परिसरात नाहीतच आणि झाडे लावायची म्हटलं तर जागा कुठे आहे? लोकसंख्या इतक्या वेगानं वाढतेय जिथे माणसांना राहायला जागा नाही तिथे झाडं लावायला जागा कुठून येणार? शेकडो समस्या लोकांपुढे आ वासून उभ्या आहेत. आता प्रदूषणाच्या विळख्यातून सुटकेसाठी चीनचे प्रयत्न सुरू आहेत. त्यावर त्यांनी उपायही शोधून काढला आहे. काँक्रिटच्या जंगलातच हिरवेगार जंगल उभारण्याची तयारी चीनने सुरू केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा