चीनमध्ये आशियाई हत्तीचा एक कळप मोठ्या प्रवासासाठी निघाला आहे. हे हत्ती नक्की कुठे निघाले आहेत यासंदर्भातील ठोस माहिती सध्या कोणाकडेही नाहीय. मात्र मागील १५ महिन्यांमध्ये या हत्तींनी ५०० किलोमीटरचा प्रवास केलाय. मात्र चीनमधील जोरदार पावसामुळे या हत्तींच्या प्रवासाला थोडा ब्रेक लागलाय. याच ब्रेक दरम्यान हा हत्तींचा कळत जियांग जिल्ह्यामधील एका जंगलात आराम करताना आढळून आलाय. जंगलामध्ये झोपलेल्या हत्तीच्या कळपांचा फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालाय. प्रवासावर निघालेले हे हत्ती नक्की कुठे चाललेत याची माहिती उपलब्ध नसली तरी व्हायरल फोटोंमुळे या हत्तींना जगभरामध्ये ओळख मिळालीय.

जंगलामध्ये झोपलेल्या हत्तीच्या कळपाचा हा व्हायरल फोटो इंडियन फॉरेस्ट ऑफिसर म्हणजेच वनविभागाचे अधिकारी असणाऱ्या परवीन कासवान यांनी शेअर केला आहे. “हत्ती कसे झोपतात हे कोणाला पहायचं असेल तर हा फोटो पाहा,” असं कासवान यांनी फोटोला कॅप्शन देताना म्हटलं आहे. या फोटोला २४ तासांमध्ये साडेसहा हजारहून अधिक रिट्विट मिळालेत. ५७ हजारांहून अधिक जणांनी हा फोटो लाईक केलाय.

नक्की वाचा >> “म्हणजे तुम्हाला चहा सुद्धा नीट बनवता येत नव्हता?”; मोदींना त्या आठवणींवरुन नेत्याने लगावला टोला

बीबीसी आणि रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, या हत्तींच्या कळपावर चीनमधील अधिकारी लक्ष ठेऊन आहेत. हे हत्ती आत्तापर्यंत शहरांमधून, शेतांमधून आणि अनेक गावांमधून चालत आले आहेत. वाटेत त्यांनी शेतमालाचं मोठं नुकसान केलं आहे. मात्र स्थानिक सरकारने या हत्तींना संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. या हत्तींवर लक्ष ठेवण्यासाठी १४ ड्रोन्स तैनात करण्यात आले आहेत. ५०० जणांना या हत्तींना योग्य आहार मिळेल यासंदर्भात काळजी घेण्याची जबाबदारी देण्यात आली. रस्त्यांवरील वाहतूक थांबवून या हत्तींना नैऋत्य दिशेकडील जंगलांमध्ये नेण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे.

नक्की वाचा >> Swiggy ने विचारलं, ‘जेवलीस का?’; उद्धव ठाकरेंच्या फोटोपासून आई काय म्हणालीपर्यंत मराठी पोरा-पोरींनी दिले भन्नाट रिप्लाय

या कळपामध्ये तीन लहान हत्तींसहीत एकूण १५ हत्ती आहेत. यात सहा मादी, तीन नर, तीन लहान हत्ती आणि तीन अगदी छोटे हत्ती आहेत. युन्नान फॉरेस्ट फायरफायटिंग ब्रिगेड या हत्तींवर सध्या नजर ठेऊन आहे. या हत्तींचा मार्ग बदलण्याचा अधिकाऱ्यांनी केलेला एक प्रयत्न अपयशी ठरलाय. मात्र आता हा कळप पुन्हा नैऋत्येकडील जिशुआंगबन्ना येथील मेंग्यांगजी पार्ककडे परत वळल्याचं चित्र दिसत आहे. चीनमध्ये केवळ ३०० हत्तींचं अस्तित्व आहे. त्यामुळेच या हत्तींची खूप काळजी घेतली जात आहे.

Story img Loader