आपला शेजारी देश चीनमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ती म्हणजे येथील एका शाळेतील शिक्षिकेने एका विद्यार्थीनीने वर्गात दंगा केला म्हणून तिला एवढी भयानक शिक्षा दिली आहे. जे ऐकल्यानंतर तुमच्या अंगावर काटा येऊ शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, चीनच्या हुनान प्रांतात एक मुलगी शाळेत गेली होती. यावेळी शिक्षिकेने तिच्या डोक्यात लोखंडी पट्टी मारली. ही पट्टी मुलीच्या डोक्यात जोरात मारल्यामुळे तिचे डोके फुटून तिचा मेंदू बाहेर पडण्याच्या स्थिती निर्माण झाली होती असं सांगितलं जात आहे.
हे प्रकरण हुनानमधील बोकाई मेक्सीहु प्राथमिक शाळेतील आहे, येथील शाळेत शिकवणाऱ्या सॉन्ग माओमिंग नावाच्या शिक्षिकेने ही भयानक शिक्षा विद्यार्थीनीला दिली. या शिक्षिकेने मुलीला लोखंडी पट्टीने इतक्या जोरात मारले की तिच्या डोक्यावर ५ सेमी खोल जखम झाली आणि तिचे डोके फुटले. या घटनेतंतर शिक्षिकेने स्वत: मुलीला शाळेतील डॉक्टरांकडे नेले, त्यांनी सांगितलं, ही किरकोळ जखम आहे पण त्याला टाके घालणे गरजेचं आहे.
हेही पाहा- मालकीण करेल तसा व्यायाम करतोय कुत्रा, दोघांचा क्यूट व्हिडीओ पाहून तुम्हीही पडाल प्रेमात
दरम्यान, मुलीवर मुलीवर उपचार करण्यासाठी शाळेकडून तिला चांगल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेथील डॉक्टरांनी मुलीच्या पालकांची परवानगी आवश्यक असल्याचे सांगत तिच्यावर तातडीने उपचार करण्यास नकार दिला. डॉक्टरांच्या या अटीमुळे शाळेच्या कर्मचाऱ्यांनी मुलीच्या पालकांना या घटनेची माहिती दिली. मुलीच्या आईने सांगितलं, डॉक्टर सुरुवातीला शाळेच्या सांगण्यावरून मुलीला टाके घालणार होते. पण आम्ही त्यांना मुलीची प्रकृती तपासायला सांगितले तेव्हा तिची प्रकृती गंभीर असल्याचं समजलं.
डोकं फुटलं होतं –
लोखंडी पट्टी मारल्यामुळे मुलीचे डोकं फुटलं, धक्कादायक बाब म्हणजे डोकं फुटल्यामुळे हाडाचा एक तुकडा तिच्या डोक्यात अडकला होता. त्यामुळे डॉक्टरांनी मुलीला वाचवण्यासाठी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. ही शस्त्रक्रिया सुमारे पाच तास ही शस्त्रक्रिया चालली, कारण मुलीच्या डोक्यातील हाडांचे तुकडे काढणे खूप अवघड होते. मुलीच्या मावशीने सांगितलं, “मुलीची प्रकृती खूपच गंभीर होती. तिचा मेंदू डोक्यातून बाहेर येतो की काय असं वाटत होतं. तर सध्या या मुलीला रुग्णालयात ठेवण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक आहे.” तर या घटनेनंतर पोलिसांनी मुलीला मारणाऱ्या शिक्षिकेला अटक केली आहे.