चीनच्या तिबेट एअरलाईन्सच्या एका विमानाला भीषण अपघात झालाय. १२२ प्रवासी घेऊन उड्डाण घेत असतानाच या विमानाला आग लागली. यामुळे विमानातील ४० प्रवासी जखमी झाले. गुरुवारी (१२ मे) चीनमधील चोंगईंग (Chongqing) शहरात ही घटना घडली. मागील दोन महिन्यात चीनमध्ये दुसरा अशाप्रकारचा मोठा अपघात झालाय. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

विमानात ११३ प्रवासी आणि ९ कर्मचारी होते. अपघातानंतर विमानातील सर्व १२२ प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं. त्यातील ४० जण जखमी झाले आहेत. हे विमान चोंगईंग येथून तिबेटमधील निईंगची येथे जात होते.

या विमानाला चोंगईंग विमानतळावरील धावपट्टीवरून घसरल्यानंतर आग लागली. विमानाला आग लागली असतानाचे व्हिडीओ देखील समोर आले आहेत. त्यात विमानातून आगीचे लोट बाहेर पडताना दिसत आहेत. तसेच प्रवासी विमानापासून दूर पळत आहेत. यावेळी अग्निशामक दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न होतानाही दिसत आहे. अपघाताची चौकशी सुरू आहे. चौकशीनंतर विमानाच्या अपघाताची नेमकी कारणं समोर येतील.

दरम्यान, चीनमध्ये १२ मार्च २०२२ रोजी बोईंग ७३७ विमान कोसळलं होतं. त्यात १३२ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. यात ९ कर्मचाऱ्यांचाही समावेश होता.

Story img Loader