चोर किंवा गुन्हेगारांना शोधण्यासाठी लावण्यात येणारा वॉन्टेड (wanted) असा पोस्टर आपण बऱ्याचदा पाहिला असेल. या पोस्टरमध्ये पोलिस गुन्हेगारांचे फोटो लावतात. परंतू चीनच्या पोलीसांनी एका आरोपीचा असा काही ‘वॉन्टेड पोस्टर’ तयार केला आहे की जो पाहून सर्वांनाच आर्श्चयाचा धक्काच बसला आहे.
चिनी पोलिसांनी Ji Qinghai नावाच्या आरोपीचा बालपणीचा फोटो वापरुन वॉन्टेड पोस्टर तयार केले आहे. ही घटना चीन शहरातील Zhenxiong शहरात घडली आहे. या आरोपीवर तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांना आरोपीचा सध्याचा फोटो न मिळाल्यानं त्यांनी Zhenxiongचा लहानपणीचा फोटो वॉन्टेड पोस्टरवर वापरला. हा फोटो तो आरोपी शाळेत शिकत असतानाचा आहे.
Zhenxiong पोलिस अधिकारी मिस्टर लुई यांनी म्हटले की, ‘आम्हाला आरोपीचा सध्याचा फोटो न मिळाल्याने आम्ही बालपणीचा फोटो वापरला आहे. या आरोपीची चेहरेपट्टी बदललेली नाही. त्याचे तोंड, डोळे, नाक, ओठ हे तेव्हासारखेच आहेत.’ पोलिसांनी दिलेलं हे उत्तर ऐकून अनेकांना हसू अनावर झाले. हे पोस्टर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे.