Remote Kissing Device : तुम्ही तुमच्या पार्टनरला मिस करताय? पार्टनर तुमच्यापासून दूर राहतोय? असे प्रश्न तुमच्या नातेसंबंधात निर्माण होत असतील, तर आता काळजी करण्याची गरज नाही. कारण अशा प्रेमीयुगुलांसाठी चीनने गूड न्यूज दिली आहे. चीनच्या चांगझोऊ विद्यापाठीने एक भन्नाट प्रयोग करुन चक्क किसिंगचाच रिमोट बनवला आहे. पार्टनर तुमच्यापासून दूर असल्यास या रिमोटचा वापर करुन इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही पार्टनरला किस करु शकता. कपलला व्हर्च्युअली इंटिमेट होण्यासाठी या लॉंग डिस्टन्स किसिंग डिव्हाईसचा वापर करु शकता. या डिव्हाईसचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या रिमोटमध्ये सिलिकॉन लिप्स असून त्यात प्रेशर सेन्सर देण्यात आले आहेत. याद्वारे तुम्ही नकली किस घेण्याचा अनुभव घेऊ शकता. द चायना रन ग्लोबल टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, हा रिमोट डिव्हाईस एका अॅपच्या माध्यमातून डाऊनलोड करु शकता. त्यानंतर मोबाईल फोन चार्जिंग पोर्टला लावून अॅपच्या माध्यमातून पार्टनरसोबत जोडलं जाऊ शकता. त्यानंतर व्हिडीओ कॉल करुन या रिमोट डिव्हाईसचा वापर करुन पार्टनरला किस पाठवू शकता.

नक्की वाचा – अजगराशी पंगा! काही सेकंदातच तरुणाच्या गळ्याला घातला विळखा अन्…Video पाहून थरकाप उडेल

इथे पाहा व्हिडीओ

या किसिंगचा रिमोटचा शोध लावणाऱ्या जियांग झोंगली शास्त्रज्ञांनी स्टेट रन ग्लोबल टाईम्सशी बोलताना म्हटलं, मी प्रेयसीसोबत लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये होतो आणि फक्त फोनच्या माध्यमातून संपर्कात होतो. या रिमोट डिव्हाईसच्या माध्यमातून आम्हाला प्रेरणा मिळाली. २०१६ मध्ये मलेशियातील इमॅजिनीअरिंग इन्स्ट्यिटूटनेही अशा प्रकारचं डिव्हाईस लॉंच केलं होतं.

किसिंगर नावाच्या डिव्हाईसला स्पर्श करण्यासाठी सेन्सीटिव्ह सिलीकॉन पॅड लावण्यात आले होते, अशी माहिती सीएनएनने दिली होती. दरम्यान, या किसिंगचा रिमोटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. कही नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय, हे खूप मजेशीर आहे. तर काहिंनी यावर टीकाही केली आहे. हे खूप विचित्र आणि भयानक असल्याचं काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chinas chanzhou university invented remote kiss device for long distance relationship couple watch viral video nss
Show comments