स्त्री ही निर्सगाने बनवलेली सर्वात सुंदर कलाकृती आहे अशी सुस्ती नेहमीच ऐकायला मिळते. पण निर्सगाला आव्हान देत चीन मधल्या शास्त्रज्ञांनी असे काही रोबोट तयार केले आहे की ही खरीखुरी महिला नसून रोबोट आहे असे सांगूनही कोणाला खरे वाटणार नाही.
Viral Video : अबब! या वाहतूक कोंडीला म्हणायचे तरी काय
जियाला पहिल्यांदा शंघायमधल्या एका परिषदेत आणण्यात आले. २०१५ मध्ये मानवासारखा अत्यंत हुबेहुब दिसणारा रोबोट तयार करण्यात येत असल्याचे चीनच्या शास्त्रज्ञांनी जाहिर केले होते. तेव्हापासून हा रोबोट कसा दिसेल हे पाहण्याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. अखेर जिया जियाला पहिल्यांदाच एका परिषदेत आणण्यात आले. चीनच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या इंजिनिअरने मिळून जियाला घडवले. गेले कित्येक महिने ते या प्रकल्पावर काम करत होते. जियाच्या डोळ्यांपासून ते एकूणच तिची रचना ही हुबेहुब मानवी वाटावी अशी करण्यात आली.
पारंपारिक चीनी वेशात जियाला सगळ्यासमोर आणलं अन् तिचे ते रुप पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. ही खरी स्त्री नसून रोबोट आहे हे सांगून कोणालाही खरे वाटले नसते इतका जीवंतपणा जियामध्ये या इंजिनिअरने ओतला होता. यावेळी जियाला काही प्रश्नही विचारण्यात आले. हवामानसंबधीचे प्रश्न असो किंवा समोरची व्यक्ती स्त्री आहे की पुरुष हे ओळखून उत्तर देणे जियाने योग्य रितने पार पाडले. इतकेच नाही तर त्या परिषदेत असलेल्या एका व्यक्तीला तूम्ही खूप सुंदर दिसत आहात असे म्हणत कौतुकही जियाने केले. एकाने या रोबोला तुझा बॉयफ्रेंड आहे का असा प्रश्न विचारला त्यावर मी सिंगल राहणे पसंत करेन असे सडेतोड उत्तर तिने दिले. त्यामुळे मानवी आविष्कारातून तयार झालेली जिया सगळ्यांच्या कौतुकास पात्र ठरली.
Viral : कॉपीला आळा घालण्यासाठी चिनी शिक्षकांनी शोधला रामबाण उपाय
लवकरच मानवी रोबोटची मागणी वाढणार आहे आणि ही वाढती मागणी लक्षात घेऊन अशा प्रकारचे अनेक रोबोट बनवण्यात येणार असल्याचेही चीनने सांगितले. त्यामुळे दवाखाने, सार्वजिनिक ठिकाणी अशा प्रकारे रोबोट उपलब्ध होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.