China’s Richest Zhang Yiming’s Wealth less than half of Mukesh Ambani’s : नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या हुरुन चायना रिच लिस्टनुसार, टिक टॉकची मूळ कंपनी असलेल्या ByteDance चे संस्थापक झांग यिमिंग हे ४९.३ अब्ज डॉलर संपत्तीसह चीनमधील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत अव्वल स्थानावर पोहोचले आहेत. त्यांची एकूण संपत्ती कोट्यवधींच्या घरात असली तरीही भारताचे सर्वांत श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी यांच्या संपत्तीपेक्षा त्यांची संपत्ती निम्मीच आहे. मुकेश अंबानी यांची १०२ अब्ज डॉलर संपत्ती आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हुरुन रिसर्च इन्स्टिट्यूटकडून जगभरातील विविध देशांतील श्रीमंत व्यक्तीची यादी जाहीर केली जाते. त्यानुसार, चीनच्या यादीतील उद्याजोकांची एकूण संपत्ती ३ ट्रिलअन डॉलर आहे. महत्त्वाचं म्हणजे गेल्यावर्षीपेक्षा यंदा १० टक्क्यांनी संपत्ती कमी झाली आहे.

ऑगस्टमध्ये प्रसिद्ध झालेल्या हुरुन इंडिया रिच लिस्टनुसार , “भारत आशियातील संपत्ती निर्मिती इंजिन म्हणून उदयास येत आहे! चीनमध्ये अब्जाधीशांच्या संख्येत २५ टक्के घट झाली आहे, तर भारतात २९ टक्के वाढ झालीय. भारतात ३३४ अब्जाधीशांची नोंद झाली आहे.”

हेही वाचा >> सोन्याच्या भाववाढीमुळे ग्राहकांचा आखडता हात, धनत्रयोदशीला गेल्या वर्षाइतकीच २० टनांपर्यंत विक्री अपेक्षित

अब्जाधीशांच्या एकूण संख्येच्या बाबतीत भारत अजूनही चीनपेक्षा खूप मागे आहे. चीनमध्ये ७५३ अब्जाधीश आहेत. या वर्षीच्या चायना रिच लिस्टमध्ये फक्त ५४ नवीन नावे समाविष्ट झाली आहेत, ही दोन दशकांतील सर्वात कमी संख्या आहे. दुसरीकडे, २०२४ च्या हुरुन इंडिया रिच लिस्टमधील अब्जाधीशांमध्ये २० नव्या चेहऱ्यांची वाढ झाली.

झांग यिमिंग विरुद्ध मुकेश अंबानी (Zhang Yiming Wealth)

हुरुनच्या म्हणण्यानुसार, झांग यिमिंग (वय ४१ वर्षे) यांची एकूण संपत्ती ४९.३ अब्ज डॉलर आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, यिमिंग यांची सध्याची एकूण संपत्ती ४९.३ अब्ज डॉलरच्या जवळपास आहे. ते शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म ByteDance चे संस्थापक आहेत. टीक टॉकची ही मूळ कंपनी आहे. मागील वर्षी कंपनीची कमाई ११० अब्ज डॉलर इतकी वाढली.

दरम्यान, भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आहेत, ज्यांची एकूण संपत्ती १०२ अब्ज डॉलर आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत अंबानींच्या संपत्तीत २५% वाढ झाली आहे. Hurun India Rich List नुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरच्या किमतीत गेल्या वर्षभरात ऊर्जा आणि किरकोळ क्षेत्रातील धोरणात्मक गुंतवणूक, अंदाजित कमाई वाढ आणि अलीकडील दरवाढीमुळे त्याची दूरसंचार शाखा, Jio मधील सकारात्मक घडामोडी यामुळे वाढ झाली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chinas richest zhang yimings wealth less than half of mukesh ambanis sgk