Chinchpokli cha Chintamani First Look 2023: गणेश उत्सव अगदी काहीच दिवसांवर येऊ ठेपला आहे. सर्वांनाच बाप्पाच्या भेटीची ओढ लागली आहे. यावर्षी प्रत्येक मंडळ काहीतरी आगळे वेगळे करत आहे. त्यामुळे यंदा गणेश उत्सवाला अधिकच रंगत आली आहे. काही मुंबईच्या गणेशाचे आगमन झाले असून, तरूणाईचं खास आकर्षण असलेल्या चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आज आगमन सोहळा आहे.अलोट भक्तांच्या गर्दीमध्ये हा गणपती मंडपामध्ये विराजमान होणार आहे. दरम्यान बाप्पाचा फर्स्ट लूक सध्या समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

यंदा १९ सप्टेंबरला गणेश चतुर्थी असून, आज शनिवार ९ सप्टेंबरला चिंचपोकळीच्या चिंतामणीचं आगमन होत आहे. पुन्हा मंडळाकडून गणपतीची भव्य मूर्ती मंडपामध्ये विराजमान होणार आहे. यंदा चिंतामणीच्या गणेशाची मुर्ती हटके असणार आहेच आणि मंडप देखील भव्य दिव्य असा सजवण्यात आला आहे. दुपारी २ दरम्यान आगमन सोहळा सुरु होईल. चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचं यंदाचं हे १०४ वे वर्ष आहे. चिंचपोकळीतील चिंतामणी मंडळ म्हणजे, मुंबईतील जुन्या मंडळांपैकी एक आहे. सर्वच भक्तांना चिंतामणीच्या आता आगम सोहळ्याचं वेध लागले आहेत, गणेशभक्त वर्षभर आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची वाट पाहत असतात.

Vivah muhurat 2025 Marriage Dates in 2025 Hindu Panchang
Vivah Muhurat 2025 : नवीन वर्ष २०२५ मध्ये विवाहासाठी किती शुभ मुहूर्त, पाहा जानेवारी ते डिसेंबरपर्यंतच्या तारखांची यादी
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
What Raj Thackeray Said?
Raj Thackeray : ‘सत्तेत जायचा फॉर्म्युला काय?’ राज ठाकरे म्हणाले, “या निवडणुकीत..”
Navri Mile Hitlarla
एजेवर येणार मोठे संकट, श्वेताच्या ‘त्या’ कृतीमुळे होणार अटक; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका नव्या वळणावर
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा
Dev deepawali 2024
देव दिवाळीपासून शनी-गुरूचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी
loksatta readers feedback
लोकमानस: संशय आणि असुरक्षिततेचा परिणाम
yek number OTT release update
तेजस्विनी पंडित निर्मित ‘येक नंबर’ घरबसल्या पाहता येणार, ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

पाहा बाप्पा चिंतामणीचा फर्स्ट लूक

हेही वाचा >> गणेशभक्तांसाठी मोठी बातमी! चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’च्या आगमनाची तारीख ठरली, पण मुंबई पोलिसांनी केलं ‘हे’ मोठं आवाहन

थेट घरबसल्या घ्या दर्शन

चिंतामणीचं प्रथम दर्शन आणि आगमन सोहळा जगभरातील भाविकांना घरबसल्या देखील पाहता येणार आहे. हा सोहळा “Chinchpoklicha Chintamani” च्या अधिकृत युट्युब चॅनेलवर आणि त्यांच्या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे.

चिंचपोकळीच्या चिंतामणी उत्सव मंडळाची ऐतिहासिक पार्श्वभूमी

सन १९४४ साली मंडळाचे रौप्य महोत्सव साजरे झाले. १९५६ साली मंडळाची घटना तयार करण्यात आली. त्यामध्ये ‘चिंचपोकळी गणेशोत्सव हे नाव बदलून चिंचपोकळी उत्सव मंडळ असे नामकरण करण्यात आले. गणेशोत्सव मंडळ हे वर्षातील मर्यादित कालावधीसाठी असते पण मंडळाच्या समाजकार्याचा कालावधी मर्यादित नव्हता. सामाजिक क्षेत्रात वर्षभर कार्यरत व्हावे या हेतूने हे नामकरण करण्यात आले. १९२० साली स्वातंत्र्य हेच ध्येय या प्रेरणेने तरुण भारावलेले होते. समाज प्रबोधन आणि लोक शिक्षणाचे कार्य सिद्धीस नेण्यासाठी त्याकाळी उत्सव मंडळाची स्थापना करण्यात आली होती. १९६८-६९ साली सुवर्ण महोत्सव, १९७९ साली-८० साली हिरक महोत्सव तर १९९४-९५ साली ७५ वे वर्षे साजरे करण्यात आले.