Chinchpoklicha Chintamani Aagman Sohala 2024: मुंबईतील लालबाग, चिंचपोकळी हा भाग गणेशभक्तांसाठी पंढरी मानला जातो. जसजसा सप्टेंबर महिना जवळ येऊ लागला आहे गणरायाच्या आगमनाची आतुरता वाढत चालली आहे. यामध्येच मुंबईतील लालबाग परिसरातील चिंचपोकळीच्या गणपतीच्या आगमनाची आतुरता गणेश भक्तांना असते. दरवर्षी या ठिकाणी बाप्पााच्या आगमनासाठी लाखो भाविकांची गर्दी पाहायला मिळते. तर, याच बाप्पाच्या आगमनाची तारीख चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाकडून काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आली असून उद्या म्हणजेच ३१ ऑगस्ट रोजी चिंचपोकळीतील चिंतामणीचं आगमन आहे. दरम्यान आता या मंडळाच्या अध्यक्षांनी आगमनापूर्वी काही महत्त्वाच्या सूचना देत गणेशभक्तांना आवाहन केलं आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

खरंतर, चिंचपोकळीतील चिंतामणी मंडळ हे मुंबईतील सर्वात जुन्या गणेशोत्सव मंडळांपैकी एक आहे. विशेष म्हणजे, चिंतामणीचा बाप्पा हा आगमनाधीश म्हणून ओळखला जातो. त्यामुळे सर्वच भक्तांना या गणपतीच्या आगमनाची चाहूल लागलेली असते. भक्तांची हीच उत्सुकता लक्षात घेऊन मंडळाच्या वतीने चिंतामणीच्या आगमन सोहळ्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार, यंदाचा चिंतामणी आगमन ३१ ऑगस्ट २०२४ रोजी शनिवारी पार पडणार आहे. दुपारी २ वाजता हा आगमन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Shiva
Video: आशू आणि शिवाच्या आयुष्यात दिव्यामुळे नवीन विघ्न? प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी केली विनंती, म्हणाले, “कृपया आता काही…”
Astrological predictions 2025 for Uddhav Thackeray in Marathi
Uddhav Thackeray 2025 Astrological Predictions : ‘२०२५ पर्यंत सुवर्णकाळ…’ उद्धव ठाकरेंसाठी ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी; म्हणाले, ‘शिवसेनेचे राज्य…’
nitish kumar bows down to touch feet of pm modi
VIDEO: भरसभेत नितीश कुमार पाया पडायला गेले अन् नरेंद्र मोदींनी…; नेमकं काय घडलं?
telangana news
भाजपाचे नेते काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचे चीअरलीडर्स आहेत; केटी रामाराव यांचा आरोप!
Marathi Actors Akshay Kelkar First Reaction after announced abeer gulal serial will off air
‘अबीर गुलाल’ मालिका बंद होणार असल्याचं कळताच अक्षय केळकरला बसला धक्का, म्हणाला, “मला पुन्हा स्ट्रगल…”
wani vidhan sabha constituency BJP kunbi statement bag inspection
वणीत भाजपमागे शुक्लकाष्ठ, कुणबी वक्तव्यानंतरचे बॅग तपासणी प्रकरण अंगलट येण्याची शक्यता

अध्यक्षांनी काय आवाहन केलं

यावेळी मंडळाचे अध्यक्ष विठ्ठलदास उमानाथ पै यांनी नेमकं काय आवाहन केलंय पाहूयात. चिंतामणीच्या आगमनावेळी मोठ्या संख्येने तरुणाई उपस्थित असते. अशा वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आपले पोलीस बांधव नेहमीच तत्पर असतात. मात्र आपणही स्वत:ची काळजी घेत, आगमनाच्या मिरवणुकीत कोणताही अनुचीत प्रकार घडणार नाही याची काळजी घ्यावी असं आवाहन केलं आहे. ते पुढे सांगतात, “शनिवारी दुपारी २ वाजता या आगमनाला गणेश टॉकिजपासून सुरुवात होईल. या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या सर्व भाविकांचं मी मनापासून स्वागत करतो. आपण सर्वांनी मंडळाचे कार्यकर्ते आणि पोलीस बांधवाना सहकार्य करावे. तसेच महिलांनाही नम्र विनंती आहे की, आपणही सुरक्षेच्यादृष्टीने आपल्या आजूबाजूला काही चुकीचं घडत असेल तर तात्काळ त्याची माहिती पोलिसांना द्यायची आहे.”

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “डॉक्टर मला नवीन हृदय मिळालं” निरोगी आयुष्याची किंमत काय असते हे ‘हा’ VIDEO बघून कळेल

चिंचपोकळीच्या चिंतामणी उत्सव मंडळाची ऐतिहासिक पार्श्वभूमी (Chinchpokali Chintamani History)

१९४४ साली मंडळाने रौप्यमहोत्सव साजरा केला. १९५६ साली मंडळाची घटना तयार करण्यात आली. त्यामध्ये चिंचपोकळी हे नाव बदलून चिंचपोकळी उत्सव मंडळ, असे नामकरण करण्यात आले. गणेशोत्सव मंडळ हे वर्षातील मर्यादित कालावधीसाठी असते; पण मंडळाच्या समाजकार्याचा कालावधी मर्यादित नव्हता. सामाजिक क्षेत्रात वर्षभर कार्यरत व्हावे या हेतूने हे नामकरण करण्यात आले. १९२० साली स्वातंत्र्य हेच ध्येय या प्रेरणेने तरुण भारावलेले होते. समाजप्रबोधन आणि लोकशिक्षणाचे कार्य सिद्धीस नेण्यासाठी त्या काळी उत्सव मंडळाची स्थापना करण्यात आली होती. १९६८-६९ साली सुवर्णमहोत्सव, १९७९-८० साली हीरक महोत्सव, तर १९९४-९५ साली अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले.