Chinchpoklicha Chintamani Aagman Sohala 2024: मुंबईतील लालबाग, चिंचपोकळी हा भाग गणेशभक्तांसाठी पंढरी मानला जातो. दरवर्षी या ठिकाणी लाखो गणेशभक्त आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचत असतो. दरम्यान, तरुणाईचं खास आकर्षण असलेल्या चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी‘च्या आगमन सोहळ्याची तारीख मंडळाकडून जाहीर करण्यात आली आहे. अलोट भक्तांच्या गर्दीमध्ये हा गणपती मंडपामध्ये विराजमान होणार आहे. ‘चिंतामणी‘चं प्रथम दर्शन आणि आगमन सोहळा पाहण्यासाठी दरवर्षी या परिसरात लाखोंची गर्दी होत असते. मंडळाकडून गणपतीची भव्य मूर्ती मंडपामध्ये विराजमान होणार आहे. यंदा ‘चिंतामणी‘ची मूर्ती हटके असणार आहेच आणि मंडपदेखील भव्य-दिव्य अशा रीतीनं सजवण्यात आला आहे.

चिंतामणी आगमन सोहळा तारीख आणि वेळ (Chintamani Aagman Sohala date and time)

Malavya Yoga and Kendra Trikon Rajyoga 2025
२०२५मध्ये ग्रहांचा अद्भुत संयोग! मीन राशीत निर्माण होईल केंद्र त्रिकोण-मालव्य राजयोग; नोकरीत होईल पदोन्नती, अचानक होईल आर्थिक लाभ
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Guru Asta 2025 Guru will set for 27 days in the new year
Guru Ast 2025: नवीन वर्षात २७ दिवसांनी अस्त होणार गुरू! ‘या’ राशींची होणार चांदी, झटपट वाढेल पगार
Mangal Rashi Parivartan 2024
४२ दिवसानंतर नुसता पैसा; मंगळाच्या राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती होणार भाग्यवान
Shani Budh Yuti 2025 astrology
Shani Budh Yuti 2025 : नवीन वर्षात सोन्याचा हंडा घेऊन लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींच्या मंडळींचे दार? शनी-बुधाच्या संयोगाने होऊ शकाल लखपती
Surya Shani Yuti 2025
२०२५ ची सुरूवात ‘या’ तीन राशींसाठी नुकसानदायक; दोन मोठ्या ग्रहांच्या एकत्र येण्याने आर्थिक समस्या उद्भवणार
Lucky Numerology 2025
Lucky Numerology 2025: ‘या’ तिथीला जन्मलेल्या लोकांचा नववर्षात होणार भाग्योदय, बँक बॅलन्स वाढणार, नोकरीत मिळणार यश
Mars Gochar 2024
पुढील ११० दिवस मंगळ देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार संपत्तीचे सुख अन् प्रत्येक कामात यश

आगमनाधीश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी‘च्या आगमन सोहळ्याची तारीख मंडळाकडून जाहीर करण्यात आली आहे. चिंचपोकळीतील चिंतामणी मंडळ म्हणजे मुंबईतील जुन्या मंडळांपैकी एक आहे. सर्वच भक्तांना आता चिंतामणीच्या आगमन सोहळ्याचे वेध लागले आहेत. गणेशभक्त वर्षभर आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची वाट पाहत असतात, अशातच चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या आगमन सोहळ्याची तारीख मंडळाकडून जाहीर करण्यात आली आहे. ३१ ऑगस्ट रोजी शनिवारी हा आगमन सोहळा पार पडणार आहे. या आगमन सोहळ्याची वेळ ही दुपारी २ वाजता असणार आहे. यावेळी मोठ्या संख्येने तरुणाई उपस्थित असते. अशा वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आपले पोलीस बांधव नेहमीच तत्पर असतात.

चिंतामणी मंडळाने दिली माहिती

चिंचपोकळीचा चिंतामणी या मंडळाकडून सोशल मीडियावर इन्स्टाग्रामवर आगमन सोहळ्याची माहिती दिली आहे. “चिंतामणी भक्तांसाठी आनंदाची बातमी… ज्या दिवसाची वर्षभर आपण सगळे वाट बघत असतो तो क्षण म्हणजेच आपल्या सगळ्यांच्या लाडक्या चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा. चला तर चिंतामणीच्या दिमाखदार आणि भव्य आगमन सोहळ्याचे साक्षीदार होऊन त्याला भेटूया : ३१ ऑगस्ट २०२४”, अशी माहिती मंडळाने दिली आहे.

पाहा पोस्ट

हेही वाचा >> “पैशासाठी नाहीरे…” या आजोबांच्या कष्टामागचं कारण ऐकून तुमचाही जगण्याचा दृष्टीकोन बदलेल; वाचा नक्की काय घडलं?

चिंचपोकळीच्या चिंतामणी उत्सव मंडळाची ऐतिहासिक पार्श्वभूमी (Chinchpokali Chintamani History)

१९४४ साली मंडळाने रौप्यमहोत्सव साजरा केला. १९५६ साली मंडळाची घटना तयार करण्यात आली. त्यामध्ये चिंचपोकळी हे नाव बदलून चिंचपोकळी उत्सव मंडळ, असे नामकरण करण्यात आले. गणेशोत्सव मंडळ हे वर्षातील मर्यादित कालावधीसाठी असते; पण मंडळाच्या समाजकार्याचा कालावधी मर्यादित नव्हता. सामाजिक क्षेत्रात वर्षभर कार्यरत व्हावे या हेतूने हे नामकरण करण्यात आले. १९२० साली स्वातंत्र्य हेच ध्येय या प्रेरणेने तरुण भारावलेले होते. समाजप्रबोधन आणि लोकशिक्षणाचे कार्य सिद्धीस नेण्यासाठी त्या काळी उत्सव मंडळाची स्थापना करण्यात आली होती. १९६८-६९ साली सुवर्णमहोत्सव, १९७९-८० साली हीरक महोत्सव, तर १९९४-९५ साली अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले.

Story img Loader