Chinchpoklicha Chintamani Aagman Sohala 2024: मुंबईतील लालबाग, चिंचपोकळी हा भाग गणेशभक्तांसाठी पंढरी मानला जातो. दरवर्षी या ठिकाणी लाखो गणेशभक्त आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचत असतो. दरम्यान, तरुणाईचं खास आकर्षण असलेल्या चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी‘चा आज आगमन सोहळा आहे. आगमनाधिश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा आज आहे. लालबाग, परळ, चिंचपोकळी भागातील भक्तांची चिंतामणीची पहिली झलक पाहण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. दरवर्षी या गणरायाच्या आगमनाची सुरुवात ही रेश्मा खातू यांच्या आर्थर रोड येथील कार्यशाळेपासून होते. मात्र, यंदा आगमन मिरवणूक ही चिंचपोकळीच्या धोकादायक पुलामुळे गणेश टॉकीजपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा आज दुपारी २ वाजता सुरु करण्यात येणार आहे. दरम्यान आता या दादर पोलिसांनी आगमनापूर्वी काही महत्त्वाच्या सूचना देत गणेशभक्तांना आवाहन केलं आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचं यंदाचं हे १०४ वे वर्ष आहे. चिंचपोकळीतील चिंतामणी मंडळ म्हणजे, मुंबईतील जुन्या मंडळांपैकी एक आहे. चिंतामणीचा बाप्पा हा आगमनाधीश म्हणून ओळखला जातो. त्यामुळे सर्वच भक्तांना या गणपतीच्या आगमनाची चाहूल लागलेली असते. भक्तांची हीच उत्सुकता लक्षात घेऊन कोणताही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी आपले पोलीस बांधव नेहमीच तत्पर असतात. यावेळीही मुंबई पोलीस दलातर्फे चिंतामणीच्या आगमन सोहळ्याविषयी चिंतामणी भक्तांना आवाहन केले आहे.

viral video
VIDEO : असे विद्यार्थी मराठी शाळेतच घडू शकतात! संगणकालाही टक्कर देतात हे विद्यार्थी, अनोखी कला एकदा पाहाच
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
pushpa in Kolhapur
कोल्हापुरच्या रस्त्यावर फिरतोय पुष्पा! चिमुकले घाबरले तर मोठ्यांनी काढली सेल्फी, पाहा VIRAL VIDEO
shocking video : parents should take care of their children.
VIDEO : पालकांनो, तुमची मुले करू शकतात अशा चुका! चिमुकला अडकला लिफ्टमध्ये; पाहा, पुढे काय घडले?
a groom said amazing ukhana for bride
“मेथीची भाजी आहे स्वस्त…” नवरदेवाने घेतला भन्नाट उखाणा, VIDEO एकदा पाहाच
Bengaluru man drives with dogs perched on car’s roof, abuses motorist who filmed the scene
अमानवी कृत्य! कुत्र्यांना धावत्या कारच्या छतावर ठेवले अन् जाब विचारणाऱ्याला केली शिवीगाळ, Video Viral पाहून नेटकरी संतापले
Vinod Kambli Meet Sachin Tendulkar In Cricket Coach Ramakant Achrekar Memorial Inauguration Video Viral netizens getting emotional
VIDEO: ‘अशी वेळ शत्रूवर सुद्धा येऊ नये’; इच्छा असूनही मिठी मारु शकला नाही, विनोद कांबळी-सचिनच्या भेटीत नेमकं काय घडलं?
a young guy said funny ukhana by mentioning the name of dhoni
“धोनीने मारला सिक्स…” तरुणाने घेतला भन्नाट उखाणा, VIDEO एकदा पाहाच

पोलिसांनी केलं आवाहन

चिंतामणीच्या आगमनावेळी मोठ्या संख्येने तरुणाई उपस्थित असते. यावेळी दादरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल सं. कदम यांनी नेमकं काय आवाहन केलंय पाहूयात.

पोलिसांनी भक्तांना “रेल्वे प्रवासादरम्यान आणि आगमनाच्या गर्दीत मौल्यवान वस्तू न बाळगण्याचं आवाहन केलं आहे. चालत्या लोकलमध्ये चढण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न करु नका, अन्यथा आपला जीव जाऊ शकतो. समाज कंटकांपासून दूर राहा. तसेच गर्दीमध्ये काही संशयीत वस्तू, आक्षेपार्ह वस्तू मिळाली तर पोलिसांशी संपर्क साधा, आफवांवर विश्वास ठेवू नका. तसेच काहीही अडचण आली तरी पोलिसांना संपर्क करा. पोलीस आपल्या सेवेसाठी नेहमीच हजर असतील” असे आवाहन पोलिसांनी केलं आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> गणेशभक्तांसाठी मोठी बातमी! चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं उद्या आगमन, पण मंडळाच्या अध्यक्षांनी केलं ‘हे’ मोठं आवाहन

चिंचपोकळीच्या चिंतामणी उत्सव मंडळाची ऐतिहासिक पार्श्वभूमी (Chinchpokali Chintamani History)

१९४४ साली मंडळाने रौप्यमहोत्सव साजरा केला. १९५६ साली मंडळाची घटना तयार करण्यात आली. त्यामध्ये चिंचपोकळी हे नाव बदलून चिंचपोकळी उत्सव मंडळ, असे नामकरण करण्यात आले. गणेशोत्सव मंडळ हे वर्षातील मर्यादित कालावधीसाठी असते; पण मंडळाच्या समाजकार्याचा कालावधी मर्यादित नव्हता. सामाजिक क्षेत्रात वर्षभर कार्यरत व्हावे या हेतूने हे नामकरण करण्यात आले. १९२० साली स्वातंत्र्य हेच ध्येय या प्रेरणेने तरुण भारावलेले होते. समाजप्रबोधन आणि लोकशिक्षणाचे कार्य सिद्धीस नेण्यासाठी त्या काळी उत्सव मंडळाची स्थापना करण्यात आली होती. १९६८-६९ साली सुवर्णमहोत्सव, १९७९-८० साली हीरक महोत्सव, तर १९९४-९५ साली अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले.

Story img Loader