Chinchpoklicha Chintamani Aagman Sohala 2024: मुंबईतील लालबाग, चिंचपोकळी हा भाग गणेशभक्तांसाठी पंढरी मानला जातो. दरवर्षी या ठिकाणी लाखो गणेशभक्त आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचत असतो. दरम्यान, तरुणाईचं खास आकर्षण असलेल्या चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी‘चा आज आगमन सोहळा आहे. आगमनाधिश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा आज आहे. लालबाग, परळ, चिंचपोकळी भागातील भक्तांची चिंतामणीची पहिली झलक पाहण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. दरवर्षी या गणरायाच्या आगमनाची सुरुवात ही रेश्मा खातू यांच्या आर्थर रोड येथील कार्यशाळेपासून होते. मात्र, यंदा आगमन मिरवणूक ही चिंचपोकळीच्या धोकादायक पुलामुळे गणेश टॉकीजपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा आज दुपारी २ वाजता सुरु करण्यात येणार आहे. दरम्यान आता या दादर पोलिसांनी आगमनापूर्वी काही महत्त्वाच्या सूचना देत गणेशभक्तांना आवाहन केलं आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा