जो जन्माला येतो, त्याचा मृत्यू अटळ असतो. पण, कोणत्या व्यक्तीचा मृत्यू कधी, कुठे आणि कसा होईल ते काही सांगता येत नाही. माणसाच्या जीवनात मृत्यू ही एक अशी घटना आहे; जी अटळ आहे आणि ती कोणीच टाळू शकत नाही. आपण आज आहोत, तर उद्या नाही. एखाद्याच्या आयुष्याचा शेवटचा क्षण कधी येईल, हे सांगता येत नाही. आयुष्यात काही घटना अशा असतात की, ज्या आनंदाला दु:खात बदलतात. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हल्ली हृदयविकाराच्या झटक्याद्वारे मृत्यूने झडप घालण्याचे प्रमाण वाढले आहे. अलीकडच्या काळात लहान वयातील मुलांमध्येही हृदयविकाराच्या झटक्याने निधनाच्या बातम्या समोर येतच असतात आणि यासंबंधी सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत; ज्यात अनेकांचा अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यामुळे जीव गेल्याचे दिसून येते.
कुणी खेळता खेळता जग सोडून गेले, तर कुणी बसलेल्या स्थितीत असतानाच जीव गमावला. अशा अनेक प्रकरणांचे व्हिडीओ समोर आले आहेत. आता खेळता खेळता एका लहान मुलाला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या आकस्मिक मृत्यूमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. एका मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे; ज्यामध्ये १७ वर्षीय प्रसिद्ध बॅडमिंटनपटूचा खेळता खेळता मृत्यू झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
(हे ही वाचा : अवघ्या ३० सेकंदांत सरड्यानं हरणाला केलं फस्त; जंगलातील Video पाहून तुमच्याही अंगावर येईल काटा )
मिळालेल्या माहितीनुसार, इंडोनेशियातील योग्याकार्तामध्ये एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेदरम्यान ही दुर्घटना घडली. बॅडमिंटन खेळत असताना एक खेळाडू अचानक कोर्टवर कोसळला. कोणालाही काही समजण्यापूर्वीच त्या खेळाडूचा मृत्यू झाला. या चिनी खेळाडूला हृदयविकाराचा झटका आला आणि तो खाली पडला, तेव्हा खेळाडू, रेफ्री आणि प्रेक्षक त्याच्याकडे बघतच राहिले.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये असे दिसून येते की, हा बॅडमिंटनपटू पूर्ण ऊर्जेने खेळत असताना अचानक तो जमिनीवर पडला. प्रकरण काय आहे ते कोणालाच समजू शकले नाही. पुढच्या दोन मिनिटांत त्याला रुग्णालयात पाठविण्यात आले; परंतु डॉक्टर त्याचा मृत्यू टाळू शकले नाहीत.
झांग झिजी नावाचा चीनचा प्रसिद्ध बॅडमिंटनपटू आशियाई ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेत जपानच्या काझुमा कावानोविरुद्ध खेळत होता. त्याला खेळता खेळता हृदयविकाराचा झटका आल्याने अचानक तो कोसळला, झांग झिजी कोर्टवर कोसळल्यानंतर तो तडफडत होता. कोर्टबाहेर असलेल्यांनाही हे लक्षात आलं नाही की त्याला काय होतंय. काही वेळाने त्याला रुग्णालयात नेण्यात आले; पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. बॅडमिंटन आशिया आणि इंडोनेशिया बॅडमिंटन असोसिएशनने (पीबीएसआय) एक निवेदन जारी केले आहे की, आम्ही एक प्रतिभावान खेळाडू गमावला आहे.
येथे पाहा व्हिडीओ
झांगने बालवाडीत असताना बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली. गेल्या वर्षीच त्याचा चीनच्या राष्ट्रीय युवा संघात समावेश करण्यात आला होता. त्याच्या आकस्मिक निधनाने आता जगभरात शोककळा पसरली आहे. भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूनेही झांग याच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. पी. व्ही. सिंधूने लिहिले, “आम्ही एक अतिशय प्रतिभावान खेळाडू गमावला आहे.”