आजपर्यंत तुम्ही आईस्क्रीमचे वेगवेगळे फ्लेवरच्या आईस्क्रीमची चव चाखली असेल. पण सध्या एक वेगळीच आईस्क्रीम सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. ही आईस्क्रीम आगीत सुद्धा ठेवली तरी विरघळत नाही. विशेष म्हणजे ही आईस्क्रीम चीनमध्ये बनलेली आहे. चीनमध्ये बनलेल्या वेगवेगळ्या वस्तूंची कायम चर्चा होत असते. चीनमधली ही चाईस्क्रीम पाहून सारेच जण हैराण झाले आहेत.
सोशल मीडियावर चर्चेत आलेली हा चाईस्क्रीम पूर्वी ‘हर्मीस ऑफ आईस्क्रीम’ म्हणून ओळखली जात होती. हर्मीस हे शास्त्रीय ग्रीक संस्कृतीत संरक्षक म्हणून दर्जा दिलेल्या ग्रीक देवाचे नाव आहे. न्यूज एजन्सी एएफपीने दिलेल्या वृत्तानुसार, चीनी आईस्क्रीम चाईस्क्रीमचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. यात लायटर किंवा ब्लोटॉर्चसमोर ही चाईस्क्रीम ठेवल्यानंतरही ते वितळत नसल्याचे दिसत आहे. काही व्हिडीओंमध्ये आईस्क्रीम ३१ डिग्री सेल्सिअसवर ठेवण्यात आले होते.
आणखी वाचा : म्हशीने आपल्या हटके स्टाईलने कासवाची केली मदत, पाहा VIRAL VIDEO
या अनोख्या आईस्क्रीमचा व्हायरल व्हिडीओ पाहून इंटरनेट युजर्स आईस्क्रीममध्ये वापरल्या जाणार्या घटकांवर प्रश्न उपस्थित करत आहेत. कंपनी असे कोणते साहित्य वापरून ही चाईस्क्रीम बनवत असतील, असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. कंपनीच्या आईस्क्रीममध्ये लक्षणीय प्रमाणात अॅडिटिव्ह टाकण्यात आले आहे का, असा प्रश्न इंटरनेट युजर्स उपस्थित करत आहेत. कंपनीच्या सर्वात महागड्या आईस्क्रीमचे नाव ‘झोंग झ्यू गाओ’ आहे. त्याची किंमत ६६ युआन म्हणजे १० डॉलर (सुमारे ८०० रुपये) आहे. चिनी बाजारपेठेत ही कंपनी मॅग्नम आणि Haagen-Dazs सारख्या पाश्चात्य आईस्क्रीम ब्रँडला आव्हान देते.
आणखी वाचा : OMG! कित्येक फूट उंचावर क्रेनला लटकत राहिला कामगार आणि…, पाहा VIRAL VIDEO
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : हिंदू-मुस्लिम हे तर रक्ताचं नातं! VIRAL VIDEO पाहून तुम्हीही असंच म्हणाल…
वाद निर्माण झाल्यानंतर कंपनीने या आठवड्यात बुधवारी एक निवेदन जारी केले. कंपनीचा दावा आहे की सरकारी अन्न सुरक्षा नियमांचे पालन करूनच ही आईस्क्रीम तयार केली जाते. कंपनीने सोशल मीडिया वीबोवर एक पोस्ट टाकून स्पष्टीकरण दिले आहे, या पोस्टला लाखो लाईक्स मिळाले आहेत. कंपनीने म्हटले आहे की, ‘आमचा विश्वास आहे की बेकिंग, ड्रॉइंग किंवा गरम करून आईस्क्रीमच्या गुणवत्तेचा न्याय करणे वैज्ञानिकदृष्ट्या योग्य नाही.’ कंपनीने सांगितले की, यात स्टेबिलायझर्स म्हणजेच फूड अॅडिटीव्ह वापरत आहेत ते अमेरिकेसह अनेक देशांमध्ये मान्यताप्राप्त आहेत.