जगभरात प्राण्यांची आवड असलेले लोक त्यांच्या घरी नवनवीन प्रकारचे प्राणी पाळण्यासाठी घेऊन येत असतात. अनेकदा तर काही लोक असे प्राणी घरी घेऊन येतात ज्यांच्याबद्दल त्यांना काहीच माहिती नसते, केवळ दिसायला चांगले वाटले म्हणून ते त्यांना घरी घेऊन येतात. त्यामुळे अशा लोकांची प्राण्याच्या खरेदीमध्ये फसवणूकही होते. सध्या असाच एक प्रकार चीनमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबासोबत घडला आहे. ज्या कुटूंबाने जवळपास दोन वर्ष कुत्रा म्हणून ज्याला पाळत होते तो एक अस्वल असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चीनमधील एक कुटुंब मागील दोन वर्षांपासून कुत्रा म्हणून पाळत होते, ते एक दुर्मिळ जातीचे अस्वल होते. ज्याची माहिती मिळताच कुटुंबीयांना धक्का बसला आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, चीनच्या युनान प्रांतातील एका गावात राहणार्या सु युनने २०१६ च्या सुट्ट्यांमध्ये तिबेटी मास्टिफ पिल्लू समजून एक प्राणी खरेदी केला होता. दोन वर्षांनंतर, जेव्हा तो प्राणी मोठा झाला तेव्हा त्याचे वजन २५० पौंडांनी वाढून सुमारे ११४ किलो झाले. शिवाय तो दोन्ही पायांनी चालायला लागला, त्यामुळे कुटुंबीयांना संशय आला आणि त्यांनी आपल्या कुत्र्याबाबतची माहिती गोळा केली. त्यानंतर त्यांना असे आढळून आले की, ते ज्या प्राण्याला इतक्या दिवसांपासून कुत्रा म्हणून सांभाळत होते तो एक आशियाई काळा अस्वल आहे.
हेही पाहा- कुत्र्याला वाचवण्याच्या नादात झाला भयंकर अपघात, बाईकस्वार थेट कारच्या बोनेटवर पडल्याचा Video व्हायरल
तपासात आढळला अस्वल –
तर सु युनने आपल्या कुत्र्याच्या भूकेमुळे खूप चिंतित असायच्या अशी माहिती न्युयॉर्क पोस्टने दिली आहे. शिवाय या कुत्र्याचे शरीर आणि वजन दिवसेंदिवस वाढत होते ज्यामुळे त्यांनाही त्याच्याबद्दल संशय येऊ लागला. त्यानंतर सु युन यांनी तातडीने अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. अधिकाऱ्यांनी त्यांच्या तपासात सू युन यांनी पाळलेला कुत्रा हा आशियाई अस्वल असल्याचं सांगताच सर्वांना धक्का बसला.
हेही पाहा- बिबट्याने घरात घुसून कुत्र्यावर केला हल्ला; व्हायरल CCTV फुटेज पाहून तुम्हीही थक्क व्हाल
बचाव केंद्रात ठेवले –
अधिकार्यांनी माहिती दिली की, या अस्वलाचे वजन ४०० पौंडांपेक्षा जास्त, म्हणजेच सुमारे १८२ होते आणि ते एक मीटर, सुमारे ३ फूट इतके लांब होते. सु युनने पूर्ण दोन वर्षे पालनपोषण केलेल्या प्राण्याला पाहून सध्या अधिकारी खूपच घाबरले होते. सध्या या अस्वलाला चीनमधील युनान वन्यजीव बचाव केंद्रात नेण्यात आले आहे. जिथे त्याची काळजी घेतली जात आहे.