नोकरी करणारा ९० टक्के वर्ग हा आपल्या नोकरीला कंटाळलेला आहे. कामाचा वाढता व्याप आणि त्यामुळे होणारा शारीरिक त्रास वा मानसिक ताण या सगळ्यामुळे बरेच जण नोकरीला कंटाळलेले दिसतात. मात्र, एक अशी कंपनी आहे की, ज्या कंपनीमध्ये काम करण्यासाठी सगळेच इच्छुक आहेत. आता त्याचं कारण ऐकून जेवढे अविवाहित लोक आहेत, तेसुद्धा या कंपनीत काम करण्यासाठी इच्छुक असतील एवढं नक्की. तर त्याचं झालं असं की, अनेक चिनी कंपन्या त्यांच्या विविध घोषणांमुळे नेहमीच चर्चेत राहतात हे आपल्याला माहीतच आहे. अशातच आता आणखी एक कंपनी आपल्या अशाच अनोख्या घोषणेमुळे चर्चेत आहे. ही चिनी कंपनी एक नवीन उपक्रम सुरू केल्यानंतर आकर्षणाचे केंद्र बनली आहे, जी आपल्या कर्मचाऱ्यांना कामादरम्यान रोमान्स करण्यासाठी प्रोत्साहित करीत आहे. ही कंपनी डेटिंग आणि रोमान्स करण्यासाठी कर्मचाऱ्यांना चक्क बोनस देते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या कंपनीचं नाव Insta360 आहे, जी दक्षिण चीनमधील शेन्झेनस्थित एक तंत्रज्ञान कंपनी आहे. कर्मचाऱ्यांना एकमेकांच्या जवळ ठेवण्यासह एकूणच त्यांचा आनंद वाढवण्याच्या प्रयत्नात या कंपनीने डेटिंग कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमाद्वारे कर्मचारी कंपनीच्या ऑनलाइन डेटिंग प्लॅटफॉर्मवर इतर अविवाहित लोकांची ओळख करून घेऊन, त्यांना डेट करून रोख बक्षिसे मिळवू शकतात. साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या अहवालानुसार, कंपनीबाहेरील व्यक्तीची यशस्वी ओळख करून घेणाऱ्या प्रत्येक पोस्टसाठी कर्मचाऱ्याला ६६ युआन (सुमारे ७७० रुपये) मिळतात. हा उपक्रम तीन महिन्यांपूर्वी सुरू झाला. या उपक्रमानुसार जर एखादा कर्मचारी कंपनीबाहेरील कोणाला डेट करीत असेल आणि त्यांचे हे रिलेशन तीन महिने चालू राहिले, तर कर्मचारी आणि त्याचा जोडीदार अशा दोघांनाही १,००० युआन (सुमारे ११,७०० रुपये) मिळतील.

हे करण्यामागे कारण काय?

आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, कंपनी हे सगळं करून वर बोनसही देतेय; पण यामागचं कारण काय आहे? तर यामागचं कारण असं की, चीनमध्ये विवाह आणि जन्मदर दोन्ही घसरले आहेत. अलीकडील सरकारी आकडेवारीनुसार २०२४ च्या पहिल्या तीन तिमाहीत केवळ ४.७४ दशलक्ष जोडप्यांनी विवाहांची नोंदणी केली. गेल्या वर्षीच्या याच कालावधीत ५.६९ दशलक्ष विवाहांची नोंद झाली होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत १६.६% ची घट झाली आहे.

हेही वाचा >> कोणाचं कर्म कोणाला भोगावं लागलं; गाडी चालवताना मोबाईल बघायची सवय असेल तर हा VIDEO पाहाच, घडलं भयानक

सोशल मीडियावर वापरकर्ते मजेदार कमेंट करत आहेत

या उपक्रमाला कर्मचाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोशल मीडियावर नेटकरीही यावर मजेदार प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने गमतीत विचारले की, ‘कंपनीची काही भरती योजना आहे का?’, ‘सरकारनेही असेच केले पाहिजे.’ तर एका व्यक्तीनं याला असहमती दर्शवीत, ‘प्रेम पैशाने मोजता कामा नये,’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.